आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने आयोजित शालेय मुलांचा पालखी सोहळ्याने माऊली मंदिरात हरिनाम गजरात मंदिर प्रदक्षणा करीत आषाढी यात्रेच्या कालावधीत शालेय मुलांनी लक्षवेधी वारकरी सांप्रदायिक पोशाखातील वेशभूषा करीत दिंडीसह पालखी सोहळा उत्साहात साजरा केला.
प्रदक्षिणा मार्गावरील अभिनव एज्युकेशन सोसायटी संचलित सह्याद्री इंटरनॅशनल प्रशाळेतील शालेय विद्यार्थ्यानी पालखी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड, उपाध्यक्ष सुरेश लोखंडे, संचालक बाबाजी काळे उपस्थित होते. या दिंडी पालखी सोहळ्यात प्रशाळेतील मुलांनी विविध वारकरी पारंपरिक वेशभूषा केल्या.
यात विविध संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपान देव ,संत तुकाराम ,संत मुक्ताबाई, विठ्ठल रुक्मिणीमाता अशी विविध वेशभूषा करीत उपस्थितांची मने जिंकली. मुख्य आकर्षण या वेशभूषातील विद्यार्थी ठरले. सह्याद्री स्कूल पालखी दिंडीने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ते सह्याद्री स्कूल अशी लक्षवेधी दिंडी हरिनाम गजरात आणली. याप्रसंगी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध अभंग भजन सादर केले. तसेच इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी कीर्तन सादरीकरण उत्साहात केले. आषाढी पायी वारीच्या निमित्ताने दिंडी पालखी सोहळा आकाशात असतो. त्यानिमित्त पालखी मेकिंग कॉम्पिटिशन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यात पालखीच्या विविध प्रतिकृती तयार करून विद्यार्थ्यांनी या पालखी मेकिंग स्पर्धेत सहभाग घेत उत्साहानी प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास अभिनव एज्युकेशन सोसायटीचे संचालक बाबाजी काळेर यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणेश गरुड यांनी प्रबोधनात्मक केलेल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास विद्यार्थी पालक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यशस्वी नियोजनासाठी मुख्याध्यापिका प्रियांका लांडे, चैताली महाजन, अर्चना शेळके, सुचिता यादव, सोनाली शेळके, पूजा कोरे, कविता नागरगोजे, सुरेखा लोटके, हर्षाली पाटील, आशा मराठे, लक्ष्मी अंडे, पूनम जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले.