चिखली (कैलास आंधळे) – मराठी पत्रकार परिषदेचे श्रीक्षेत्र माहूरगड येथे दि. १३ जानेवारीरोजी पत्रकारांचे राज्य अधिवेशन व आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा होत असून, या सोहळ्यास जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांनी चिखली येथे केले. येथील लक्ष्मी प्रल्हाद वेल्फेअर फाउंडेशन जापनीज लँग्वेज प्रशिक्षण केंद्र जाफराबाद रोड चिखली येथील कॉलेजमध्ये मराठी पत्रकार परिषद संलग्नित डिजिटल मीडिया परिषदेच्या चिखली व देऊळगावराजा तालुका कार्यकारिणीची सभा काल, दि.२४ डिसेंबर रोजी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडीया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर होते. तर जिल्हा संघटक नारायण दाभाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेच्या चिखली व देऊळगावराजा तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांना नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले.
प्रास्ताविकात चिखली तालुकाध्यक्ष सुनिल अंभोरे यांनी डिजिटल मीडिया परिषदेची ध्येय, धोरणे समजावून सांगितली. डिजिटल मीडिया परिषद चिखली तालुका सचिव एकनाथ माळेकर यांनी संघटनेबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेचे चिखली तालुका अध्यक्ष सुनिल अंभोरे, कैलास देशमुख उपाध्यक्ष, एकनाथ माळेकर सचिव, पत्रकार भुतेकर सहसचिव, कैलास आंधळे प्रसिद्धी प्रमुख, राधेश्याम काळे कार्याध्यक्ष, शेषराव जाधव कोषाध्यक्ष, दिलिप वनवे, विनोद खजुरे,खरात सर, देऊळगावराजा तालुकाध्यक्ष राजेंद्र डोईफोडे, दत्ता हांडे, मुन्ना ठाकूर, मुबारक शहा, उषा डोंगरे, राजू डोंगरे, समाधान भालेराव, दिलीप वनवे, विठ्ठल राठोड, गणेश चव्हाण, भालेराव, अरुण तौर, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती बुलढाणा जिल्हाध्यक्ष गंगाराम उबाळे आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन चिखली तालुका सचिव एकनाथ माळेकर यांनी केले. तर आभार चिखली तालुकाध्यक्ष सुनिल अंभोरे यांनी मानले.