BuldanaBULDHANANagpurVidharbha

मंत्री गिरीश महाजन यांच्याद्वारा मुख्यमंत्र्यासोबत निवेदनातील मागण्यांवर चर्चा

– महिनाभरात शासनस्तरीय बैठक घेऊ, मोर्चेकरांना मंत्र्यांचे आश्वासन

बुलढाणा/नागपूर (संजय निकाळजे) – आपले विविध प्रश्न, समस्या व मागण्यांचे गाठोड घेऊन अतिक्रमणधारक, भूमिहीन, शेतमजूर १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात गेले होते. त्या ठिकाणी सत्याग्रह मोर्चा काढून ते गाठोड मंत्र्यांपुढे सोडण्यात आलं, तेव्हा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी महिनाभरात बैठक लावून मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. मात्र या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा ३१ जानेवारी २०२४ रोजी मुंबई मंत्रालयावर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा भूमि मुक्ती मोर्चा संघटनेचे प्रमुख भाई प्रदीप अंभोरे यांनी दिला आहे.

राज्य शासनाने वन व महसुल जमीन व निवासी पट्टे, व भूमिहिनांची १००% कर्जमुक्ति, जिंगाव, पेनटाकळी खडकपूर्णा प्रकल्पग्रस्त अतिक्रमण धारकांच्या व जिल्हा प्रशासन स्तरिय , संघटनेच्या प्रलंबीत मागण्यासठी सततच्या लढ्याची दखल विद्यमान सरकारने न घेतल्याने २८ डिसेंबरचा नागपूर हिवाळी अधिवशनात भूमि मुक्ति मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा महाराष्ट्र संयुक्त संघटनेच्या मागण्यासाठी यशवंत स्टेडियम येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. मा.मुख्यमंत्री यांनी तात्काळ उपायोजना करावी यास्तव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे, संयुक्त संघटना प्रमुख यांचे प्रमुख नेतृत्वात भाई भिमराव खरात, दिनकर घेवंदे (प्रदेश कार्याध्यक्ष), भाई बाबुराव सरदार (राज्य प्रवक्ता), भगवान गवई (मराठवाडा प्रदेशाध्यक्ष), अंबादास वानखेडे (जेष्ठ नेते), रमेश गाडेकर, मधूकर मिसाळ ,मुन्ना पराते, आदिच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा मोर्चा काढण्यात आला. दलित अदिवासी भुमिहीनांना वन व महसुल जमीन कायम पट्टे व निवासी घराचे पट्टे भुमिहीनाचे कर्जमुक्ती,स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मीती, मातृतिर्थ बुलडाणा जिल्हाचे सभाव्य विभाजनात बुलडाणा जिल्हाचे नाव मा.जिजाऊ नगर स्वतंत्र जिल्हा नामांतर घोषणा करा व विभाजीत मा जिजाऊ नगर जिल्हा, स्वतंत्र उदयनगर तालुका घोषणा करा, आत्महत्या ग्रस्त व अन्यायग्रस्त शेतकरी, शेतमंजुराना आर्थिक मदत, जिगांव प्रकल्प बांधित शेकडो कुंटुंबाना अतिक्रमीत जमीन व निवासी अतिक्रण घराचा एक रक्कमी १० लक्ष रुपये आर्थिक मोबदला व पुनरवर्सन लाभ देण्यात यावा, रमाई व अन्य घरकुल योजना लाभ १.२० लक्ष वरुन २.५ लक्ष करण्यात यावा, अतिक्रमण धारकाचे ताब्यातील शेतीवर शासनाने सौरऊर्जा प्रकल्प राबवितांना त्याचे पात्र ,अपात्र निश्चित होई पर्यंत संभाव्य प्रकल्पास स्थगीती द्यावी,बुलडाणा जिल्हासह राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीग्रस्तांना पिक नुकसान भरपाई तात्काळ वाटप करा, यासह विविध मागण्यासाठी यशवंत स्टेडियम नागपुर येथुन निघलेल्या भूमिहक्क व कर्जमुक्ति सत्याग्रह मोर्चा चे बुलडाणा जिल्हातील अतिक्रमीत जमीन धारकांची हजारोच्या सख्येने उपस्थिती होती.प्रसंगी मोर्चाचे शिष्टमंडळाने भाई प्रदीप अंभोरे यांचे नेतृत्वात मा.ना. गिरीश महाजन मंत्री यांची भेट घेतली. चर्चा नंतर मा. मंत्री महोदय द्वारा मुख्यमंत्री यांचेशी बोलून संघटनेच्या मागण्यांच्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी शासनस्तरिय बैठक महीना भरात बोलावून मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महोदय यांनी शिष्ट मंडळ प्रमुखाना दिले. यावेळी मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, वनमंत्री, महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले. शासनाने मगण्याची दखल न घेतल्यास हजारो भूमिहिनाचे ३१ जानेवारी२०२४ रोजी मुंबई मंत्रालयवर सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे प्रमुख भाई प्रदीप अंभोरे, संयुक्त संघटन प्रमुख यानी निवेदनाद्वारे सरकारला दिला आहे.जिल्हानेते भरत मुंडे,दिलीप रामटेककर, मुन्ना पराते ,गजानन बगाल ,अनीस पठान, गजानन चिंचोले, प्रवीण राजगुरु, मंगेश सुरडकर ,समाधान वाकोडे, ईलियासभाई पठाण, विजय खेडेकर ,संदीप चेके, रहमान भाई, रामेस्वर चवाण, टापरे ,गणेश इंगले,सीताराम पवार, सजंय पाटिल आदिनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!