देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – जय मल्हार खंडोबा यात्रा महोत्सवानिमित्त हिवरखेड पूर्णा येथे शिव मल्हार वाघे मुरळी डोईफोडे वाडी येथील शाहीर सुरेश डोईफोडे व सहकलाकार यांनी प्रथम बक्षीस मिळाले. स्पर्धा विजेते धोत्रा नंदाई वाघे मंडळ दोन नंबर, शिंदखेड मातला तीन नंबर, तर अंजनी शिवनी व देऊळगावमही वाघे मुरळी मंडळ यांनीसुद्धा बक्षीस मिळवले.
स्पर्धा विजेत्या टीमला बक्षीस देणारे राजू नामदेव डोईफोडे, अरुण भाऊ मखमले, रामकृष्ण कुटे, संदीप रामेश्वर कुटे, बाबुराव आनंदा नागरे, रामप्रसाद सानप, साई कृषी केंद्र समाधान उत्तम नागरे, प्रमुख पाहुणे तोतरामजी कायदे, सविता ताई मुंडे, विनोद भाऊ वाघ, प्रभाकरजी ताठे, राम जाधव , एल के मांटे , वाघमारे साहेब ठाणेदार किनगाव राजा, केदार साहेब पीएसआय किनगाव राजा , बाबुराव नागरे, दिलीप खंदलकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भाऊ मखवले , उपाध्यक्ष रामभाऊ जयाजी नागरे हे होते. तर पंचक्रोशीतील सर्व वाघे मुरळी स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला व खंडोबा भक्तांना रोमांचक आनंद दिला व पंचांनी सुद्धा अचूक भूमिका निभावली. वाघे मुरळी स्पर्धेमध्ये कला स्वर भेदिक खंडोबाची पदे जनजागरण दारूबंदी जनजागृती गर्भात मुलीची हत्या करू नका, मुलगी वाचवा व मुलगी शिकवा, घरोघरी स्वच्छता अभियान राबवा, उघड्यावर शौचालय बनवू नका, दोन बायका फजिती ऐका, मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहा ,असे अनेक जनजागृतीचे प्रयोग नाटकातून व गाण्यातून साकारले. हिंदू संस्कृतीवर स्पर्धात्मक कार्यक्रम झाले. सरपंच करुणा वाघमारे, उपसरपंच शकुंतला नागरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष सुधाकर रामभाऊ वाघ, किनगाव राजा पोलीस स्टेशनचे सहकार्य लाभले. आयोजक गणेश कुटे व भानुदास कुटे यांनी सर्व गावकऱ्यांसोबत मिळून अथक परिश्रम घेतले. सालाबादप्रमाणे चालणारा हा यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात लोकोत्सव होत असून, मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये जनजागृती होत आहे . सकाळी पाच वाजता राजू डोईफोडे यांचे सौजन्याने सैनिक मित्र भीमराव चाटे यांनी प्रथम बक्षीस डोईफोडे वाडी येथील शिव मल्हार वाघे मंडळाने प्रदान केले. शिव मल्हार वाघे मंडळाचे शाहीर सुरेश डोईफोडे, विजय साबळे, बम्हानंद बोर्डे सहकार्याने प्रथम बक्षिसाचा मान मिळाला. खंडोबाची आरती घेऊन कार्यक्रमाची सांगता केली.