भूमिमुक्ती मोर्चा संघटनाप्रमुख भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात उद्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा!
बुलढाणा (संजय निकाळजे) – नागपूर हिवाळी अधिवेशनावर उद्या, दि. १८ डिसेंबरला भूमिमुक्ती मोर्चा संघटनेच्यावतीने भूमिहीन, अतिक्रमणधारक, शेतमजूर कर्जदाराचा भूमिहक्क कर्जमुक्ति सत्याग्रह मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्ते नागपूरकडे निघाले आहेत. या मोर्चाचे नेतृत्व भूमिमुक्ती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे हे करणार आहेत.
मागील ३० वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे वन व महसूल, भूमिहक्क व भूमिहिनांची १०० टक्के कर्जमुक्ति, जिंगाव, पेनटाकळी खडकपूर्णा प्रकल्पग्रस्त अतिक्रमणधारकांच्या व जिल्हा प्रशासनस्तरीय मागण्यांसाठी मराठवाडा, विदर्भ, खान्देशातील संघटनेच्या प्रलंबीत मागण्यासठी सतत लढा दिला. मात्र, विद्यमान सरकारने दखल न घेतल्याने नागपूर हिवाळी अधिवेशनात भूमिमुक्ति मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा महाराष्ट्र संयुक्त संघटनेच्या मागण्यांच्या पूर्ततेची घोषणा मुख्यमंत्री यांनी तात्काळ करावी, यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे संयुक्त संघटना प्रमुख यांचे प्रमुख नेतृत्वात भाई भीमराव खरात (प्रदेशाध्यक्ष), दिनकर घेवंदे (प्रदेश कार्याध्यक्ष), भाई बाबुराव सरदार (राज्य प्रवक्ता), भगवान गवई (मराठवाडा प्रदेशाध्यक्ष), अंबादास वानखेडे (जेष्ठ नेते), रमेश गाडेकर (विदर्भ प्रमुख), अशोक इंगळे, प्रकाश वानखेडे (उत्तर महाराष्ट्र प्रमुख), मधूकर मिसाळ अ.वि.प्रमुख, मुन्ना पराते, दिलीप रामटेकर (नागपूर विभाग), प्रमोद पोहेकर, प्यारसिंग पॉवरा, जुलमाबाई पवार (जळगांव खा), आदिच्या प्रमुख उपस्थितीत दलित अदिवासी भूमिहिनांना वन व महसूल जमीन कायम पट्टे व निवासी घराचे पट्टे भूमिहीनांची कर्जमुक्ती, स्वतंत्र विदर्भ राज्यनिर्मिती, मातृतीर्थ बुलढाणा जिल्हाच्या संभाव्य विभाजनात बुलढाणा जिल्हाचे जिजाऊ नगर स्वतंत्र जिल्हा नामांतर घोषणा करा व विभाजीत जिजाऊ नगर जिल्हा स्वतंत्र उदयनगर तालुका घोषणा करा, आत्महत्याग्रस्त व अन्याय ग्रस्त शेतकरी शेतमजुंराना आर्थिक मदत, जिगांव प्रकल्प बांधित शेकडो कुंटुंबाना अतिक्रमीत जमीन व निवासी अतिक्रमण घराचा एक रक्कमी १० लक्ष रुपये आर्थिक मोबदला व पुनवर्सन लाभ देण्यात यावा, रमाई व अन्य घरकुल योजना लाभ १.२० लक्ष वरुन २.५ लक्ष करण्यात यावा, अतिक्रमण धारकाचे ताब्यातील शेतीवर शासनाने सौरऊर्जा प्रकल्प राबवितांना त्याचे पात्र अपात्र निश्चित होईपर्यंत संभाव्य प्रकल्पास स्थगिती द्यावी, बुलढाणा जिल्हासह राज्यातील शेतकर्यांना अतिवृष्टीग्रस्तांना पीक नुकसान भरपाई तात्काळ वाटप करा, यासह विविध मागण्यासाठी यशवंत स्टेडियम नागपूर येथून निघणार्या भूमिहक्क व कर्जमुक्ति सत्याग्रह मोर्चास बुलढाणा जळगांव, औरंगाबाद, अकोला जिल्हातील अतिक्रमीत जमीनधारकांनी आपल्या नजीकच्या भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगांव, अकोला रेल्वेस्थानकांवरुन हजारोच्या सख्येने उपस्थितीत राहण्यासाठी प्रस्थान करावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हा नेते भरत मुंडे, ईलियासभाई पठाण, गजानन जाधव, अनिस खान पठाण यांनी एका प्रसिध्द पत्रकाद्वारे केले आहे.