लोणार (विनोद पाटील तेजनकर) – तालुक्यातील वडगाव तेजन येथे घराला लागलेल्या भीषण आगीत घरातील सामान, डाळधान्य, इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्याने सुमारे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. घरातील फ्रीज फुटल्याने या नुकसानीची दाहकता वाढली होती.
सविस्तर असे, की आज (दि.१५) अंदाजे २:३० वाजता वडगाव तेजन येथील रहिवासी दिनकर देवराव तेजनकर यांच्या घराला आग लागून घरात असलेले टीव्ही, फ्रीज, सोफासेट, मिक्सर, कुलर, कपाट लाकडी, ४ फॅन इन्व्हर्टर बॅटरी, एईडी लाईट २०, रॅक घरातील पीओपी, चार्जिंग बॅटरी, गहू २ क्विंटल, तांदूळ, तूरडाळ ५० किलो, रोख रक्कम अंदाजे ५० हजार, गादी-दुलाई, रजाई व इतर सामान व काही जीवनावश्यक वस्तू असे मिळून अंदाजे साडेचार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे. याचा पंचनामा वडगाव तेजन येथील सरपंच डॉ.विजय पाटील तेजनकर, तसेच तलाठी भाकडे, तसेच वडगाव तेजन येथील सचिव नंदकिशोर तेजनकर, वडगाव तेजनच्या पोलीस पाटील कल्पनाताई , शिव पाटील तेजनकर यांच्या समक्ष करण्यात आला. घरातील प्रâीज फुटल्याने या नुकसानीची दाहकता वाढली होती.