BULDHANAHead linesVidharbha

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विधवा सन्मानासाठी घेतले जाणार ठराव!

बुलढाणा (संजय निकाळजे) – विधवा महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक, अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आपल्या संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. यासाठी त्यांनी परिपत्रक काढले असून, त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विधवा सन्मानासाठी ठराव घेतले जाणार आहे. नुकतीच बुलडाण्यात विधवा परिषद पार पडली. तिचे हे फलित मानले जात आहे.

बुलढाणा येथे 10 डिसेंबररोजी प्रा. डी एस लहाने यांच्या संकल्पनेत विधवा परिषद पार पडली. या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केले. तर जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी विधवा महिलांनी मन हेलावून टाकणाऱ्या व्यथा मांडल्या. ह्या व्यथा एकूण जिल्हाधिकारी भावनिक झाले. याच परिषदेत त्यांनी महिलांसाठी भरीव कार्य करण्याच आश्वासन दिले होते. परिषद संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी परिपत्रक काढून विधवा महिलांना सन्मान जनक वागणूक मिळावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव पारित करण्याचे निर्देशित केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती आता विधवांच्या सन्मानासाठी सरसावणार आहे. याबद्दल प्रा. डी. एस.लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर, शाहीनाताई पठाण, प्राचार्य ज्योती पाटील, मनीषा वारे ,नम्रता पाटील ,शुभांगी लहाने, अनिता कापरे, एडवोकेट संदीप जाधव, गजानन मुळे, महेंद्र सोभागे, प्रतिभा भुतेकर, गौरव देशमुख यांनी आभार व्यक्त करीत जिल्हाधिकाऱ्यांना सन्मान केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहायक रवी लहाने उपस्थित होते.
विधवा सन्मानासाठी मिशन वात्सल्य राबवले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या परीपत्रकानुसार विधवा कुटुंबास अधिकारी भेट देणार आहे. दुय्यम वागणूक असल्यास त्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यात येईल. यासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे, कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतच्या धर्तीवर सर्व ग्रामपंचायत मध्ये विधवा सन्मानासाठी ठराव पारित केले जाणार आहे. विधवा परिषदेचे हे मोठे फलित असून याला मिशन वात्सल्य असे नाव दिले आहे.


किती ही संवेदनशीलता!

कार्यक्रम अनेक होतात पण त्यातून फारसे काही निष्पन्न होतेच असे नाही. विधवा परिषद पार पडली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ कार्यक्रमापुरती हजेरी न लावता कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला ठराव बोलवून घेतला व त्या धर्तीवर जिल्हात ठराव घेण्यासाठी आदेशित केले आहे. यापुढे विधवांच्या पुनरुत्थनासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची ही संवेदनशीलता पाहून जिल्हावासीयांना सुखद धक्का बसला आहे.


मानस फाउंडेशनकडून आभार व्यक्त!
विधवा विवाहासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केले. त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी प्राध्यापक डी एस लहाने यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी विधवा परिषद घेतली. यामध्ये हजारो विधवा उपस्थित होत्या. विधवा विवाह अनिष्ट प्रथा यावर परिषदेत चर्चा झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी पाटील यांनी संविधानशीलता दाखवत आदेश काढून यंत्रणेला कामाला लावले. आज जिल्हाधिकाऱ्यांचा समिती सदस्यांनी सन्मान केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!