Breaking news

नंदुरबार जिल्ह्यात पावसाचा पहिला बळी: नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील नदीत बुडून महिलेचा मृत्यू

नवापुर जिल्हा नंदूरबार:- (ब्रेकिंग महाराष्ट्र) तालुक्यातील खांडबारा परिसरात शेगवे गावाजवळ असलेल्या नदीत एका महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरच्या महिलेची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

सविस्तर वृत्त असे की तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला यांना पूर परिस्थिती आली आहे अशातच खांडबारा गाव परिसरात शेगवे गावाजवळ नदीत एक महिला नदी ओलांडून पलीकडच्या गावात जाण्याचा प्रयत्न करीत असताना तिचा नदीत बुडून मृत्यू झाला

सदरची घटना मंगळवार सकाळची असून या महिलेचा मृतदेह शेगवे गावातील युवकांनी नदीत शोधून बाहेर काढला आहे

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सदर महिलेची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचं बोललं जात आहे या महिलेची ओळख अद्याप पटू शकलेली नाही माहिती मिळताच घटनास्थळी खांडबारा पोलीस दूर क्षेत्राचे पोलिसावलदार प्रवीण अहिरे घटनास्थळी दाखल झाले होते मृत महिलेचा देह शवविच्छेदनासाठी खांडबारा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र हातावर जय अंबे माता नाव गोंदलेला आहे सदर महिलेची ओळख पटल्यास विसरवाडी पोलिसांची संपर्क साधण्याचा आव्हान विसरवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी नितीन पाटील यांनी केल आहे.(ता.प्र)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!