आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील ध्यास फौंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिरात गुरुसन्मान करीत गुरुपौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी, उपशिक्षिका विद्या खराडे, गोपाल उंबरकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत, सत्कार, श्रींचे प्रतिम पूजन करण्यात आले.
इयत्ता चौथी व पाचवी मधील विद्यर्थ्यांनी ईशस्तवन सादर करत गुरु पौर्णिमा उत्सवास सुरुवात करण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या प्रास्ताविकातून शब्दबद्ध करीत गुरु पूजनाचे महत्त्व विशद केले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे पूजन केले. यावेळी शाल, श्रीफळ, विद्यार्थ्यांनी बनविलेले शुभेच्छा कार्ड व पुष्पगुच्छ सर्व गुरुजनांना देऊन विद्यार्थ्यांनी सर्व गुरुजनांचे पूजन करून सन्मान केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांत विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर इयत्ता तिसरी ते पाचवी मधील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी मधून मनोगते व्यक्त करीत दाद मिळवली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनिषा दरेकर, मीरा जवादवार, आरती कुलकर्णी, कल्पना मोहिते, मनिषा राजमाने आदींनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षिका विद्या खराडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन स्मिता रंधवे यांनी केले.
Leave a Reply