चिखली (तालुका प्रतिनिधी) – जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र किन्होळा येथे पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, लोकसंख्या नियंत्रणाची ग्रामस्थांनी शपथ घेतली.
या शिबिराचे उदघाटन चिखली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांच्याहस्ते व वैद्यकीय अधिकारी डॉ. साळोख यांच्यासह डॉ. गारोडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. डॉ. सांगळे यांनी पुरुष नसबंदीचे महत्व पटवून दिले. तसेच, लोकसंख्या नियंत्रण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी डॉक्टरांनी पुरुष नसबंदीची शस्त्रक्रियाही केल्यात. शिबिरास प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक विजय जाधव, सतिश इंगळे, श्रीमती माळोदेताई, रमेश ढवळे, डॉ. अनाळकर, डॉ. पाटील मॅडम, डॉ. महाजन मॅडम तसेच कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी हजर होते. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला फायदा होत असून, कर्मचारीवर्ग विनम्रतेने सेवा देत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. त्याबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनीदेखील समाधान व्यक्त केले.
Leave a Reply