ChikhaliVidharbha

मेरा बुद्रूक – पिंपळगाव सोनारा रस्त्याची होणार सुधारणा

चिखली (कैलास आंधळे) – मेरा बुद्रूक ते पिंपळगाव सोनारा, साखरखेर्डा हा रस्ता दुरूस्तीचे काम अखेर मार्गी लागले असून, आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून एक कोटी १० लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्ता कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन वायाळ यांनी महत्वपूर्ण पुढाकार घेतला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाला होता. मेरा बुद्रुक गावची बहुतांश शेती या रस्त्याने असल्याने शेतकर्‍यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता. पेरणीच्या दिवसांमध्ये शेतकर्‍यांचे वाहने ने आण करणे, पेरणीचे साहित्य शेतीपर्यंत घेऊन जाणे, सुगीच्या दिवसांमध्ये मळणीचे वाहने व धान्य आणणे या सगळ्या गोष्टी या रस्त्यावरून अशक्य झाल्या होत्या. माजी मंत्री आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे पालकमंत्री असतांना सदर रस्त्यावर ६० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुढे राज्यात सत्तांतर झाले व या रस्त्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. सदर मागील काही दिवसांपूर्वी मेरा बुद्रुक येथील शेतकर्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गजानन वायाळ यांच्या नेतृत्वामध्ये आमदार डॉ.शिंगणे यांची भेट घेवून सदर रस्त्याचे काम मंजूर करून घ्यावे, अशी मागणी करण्याचे निवेदन आमदार डॉ. शिंगणे यांना देण्यांत आले होते. लवकरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असा शब्द डॉ.शिंगणे यांनी शेतकर्‍यांना दिला होता.सदर रस्त्यावर साखळी क्र.०५/०० ते ८/५०.० व १ कोटी १० लक्ष मंजूर डॉ.शिंगणे यांनी दिलेला शब्द पाळला. सदर रस्ता मेरा बुद्रुक, पिंपळगाव सोनारा दोन्ही गावच्या शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे दोन्ही गावच्या शेतकर्‍यांनी आमदार डॉ. शिंगणे यांचे व सतत रस्त्याचा पाठपुरावा केल्यामुळे गजानन वायाळ यांचे आभार मानले.

https://breakingmaharashtra.in/maratha_reservation_maharashtra/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!