BuldanaChikhaliVidharbha

अंत्यविधी करण्यासाठी केला जातो मज्जाव; स्मशानभूमीमध्ये केलेले अतिक्रमण हटवा!

बुलढाणा (संजय निकाळजे) – तालुक्यातील पळसखेड भट येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवून अडथळा करणाऱ्यांवर आणि अंत्यविधी करण्यासाठी मज्जाव करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पळसखेड भट येथील सरकारी ई क्लास गट नंबर २५३ मध्ये मातंग समाजाची वहिवाट असलेली स्मशानभूमी आहे. याठिकाणी अंत्यविधी केले जातात. या स्मशानभूमीची ७/१२ वर नोंद होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायतीने परिपूर्ण कागदांसह प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र पळसखेड भट येथील आत्माराम खंडागळे, गणेश खंडागळे, सोहम खंडागळे वारंवार या जागेवर अतिक्रमण करतात. अंत्यविधीला अडथळा निर्माण करुन जीवे मारण्याची धमकी देतात. याबाबत 15 मे 2023 रोजी सुद्धा निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप त्यावर कारवाई झालेली नाही. दरम्यान, 9 जून 2023 रोजी विश्वजित गायकवाड या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला. त्याच्या अंत्यविधी करण्यासाठी सुद्धा मज्जाव करण्यात आला होता. परंतु पोलीस, तहसील प्रशासन आणि प्रतिष्ठित गावकरी मंडळींच्या सहकार्याने अंत्यविधी पार पडला होता. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2023 रोजी मानसी गायकवाड या मुलीच्या अंत्यविधी आणि रक्षाविसर्जनवेळी विरोध करण्यात आला होता. सदर जागा ही शासनाची असून याठिकाणी अतिक्रमण करण्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर भगवान गायकवाड, निलेश गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, प्रल्हाद गायकवाड, संदीप सुरोशे, कैलास खंदारे, ओमप्रकाश नाटेकर, अशोक गवळी, फकिरा निकाळजे, गजानन गायकवाड, रमेश निकाळजे, समाधान काकफळे, साहेबराव सुरोशे, शंकर भालेराव, विनोद महाले, गजानन काकफळे, काशिनाथ गायकवाड, बाबुराव निकाळजे, आसाराम सुरोशे, समाधान सोनुने, लंकाबाई महाले, मुक्ताबाई गायकवाड, दीपक महाले, बापूराव निकाळजे, अनिता निकाळजे, गणेश गायकवाड, प्रसेनजित गायकवाड, सुनीता गायकवाड, सुनील गायकवाड, सचिन निकाळजे, कविता गायकवाड, भाग्यश्री गायकवाड , सत्यभामा गायकवाड , अंकुश गायकवाड, मालता गायकवाड, संगिता गायकवाड, सखुबाई गायकवाड, प्रयागबाई साळवे, सिमा गायकवाड रुखमनबाई, गायकवाड, सविता गायकवाड, पार्वती महाले, निलेश सोनुने, राजू आव्हाड, कचरूबा साळवे, सिद्धार्थ मोरे, अशोक गवळी, संतोष गायकवाड, राहुल हिवाळे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!