नंदुरबार(ब्रेकिंग महाराष्ट्र) जवळपास सात महिन्या पूर्वी शहादा पालिकेची मुदत संपल्यानंतर पालिकेच्या कामकाज प्रशासनाकडून पाहिल्या जात होते. आज दिनांक १२ जुलै २०२२ रोजी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शहादा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला आहे. गुरुवार १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार असून संबंधित नगर परिषद क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सदर नगरपरिषद निवडणूक कार्यक्रम खालील प्रमाणे राहील.
अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून मंगळवार ५ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल बुधवार २० जुलै २०२२ रोजी निवडणूक कार्यक्रम जारी करण्यात येईल २२ जुलै २०२२ ते २८ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत २३ व २४ जुलै २०२२ सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येईल. शुक्रवार २९ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजेपासून नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल गुरुवार ४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अपील नसेल तेथे नाम निर्देशनपत्र मागे घेता येईल. अपील असल्यास अपीलाच्या निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल व तारखे नंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पुरती सोमवार ८ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देश पत्र मागे घेता येईल उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येईल तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल १९ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना कलम १९ मधील तरतुदीनुसार प्रसिद्ध करण्यात येईल.