भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षाचा हॉटेल रूममधील व्हिडिओ व्हायरल, तरुणीचा गंभीर आरोप!
– भाजपने घेतला तडकाफडकी राजीनामा
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती वादग्रस्त व्हिडिओ
सोलापूरच्या भाजपा जिल्हाध्यक्ष ने महिलेला संबंध ठेऊन फसविले, बेडरूम व्हिडिओ व्हायरल#पार्टी_विथ_डीफरन्स 😜@ChitraKWagh ताई जिल्हा अध्यक्ष यांचे पद व FB page Comments Box मध्ये आहे
तत्परता दाखवत दखल घ्यावी सरकारं आपले आहे.@ChitraKWagh @BJP4Maharashtra pic.twitter.com/jSxdsgBGvR— Sandeep Udmale Sandeep Ncp (@SandeepUdmale1) July 12, 2022
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) श्रीकांत देशमुख यांचा बेडरुममधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडितेने केला असून, या प्रकरणी मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तरुणीने अगदी रडत रडत हा व्हिडिओ व्हायरल केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली असून, भाजपने देशमुख यांचा तडकाफडकी राजीनामा घेत, तो मंजूरदेखील केला आहे.
श्रीकांत देशमुख यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा दीड वर्षापूर्वी पदभार स्वीकारला होता. मात्र वादग्रस्त क्लीप व्हायरल झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला असून, तात्पुरता प्रभार शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील तरुणी हॉटेलमधील रुममधील बेडकडे आपला कॅमेरा नेते, तेव्हा तेथे एक व्यक्ती बनियानवर बसलेला दिसतो. तेव्हा तरुणी सांगते, की ‘हा जो माणूस आहे, यानं मला फसवलं आहे. हा श्रीकांत देशमुख आहे. हा बायकोबरोबर संबंध ठेवून माझ्याशी संबंध ठेवतोय. लग्न करतोय हा.’ तेवढ्यात तो तरुण बेडवरून उठतो आणि त्या तरुणीकडे धाव घेत मोबाईल कॅमेरा बंद करण्याचा प्रयत्न करतो. साधारणपणे ३० सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यात आता गोपनीयता अशी काहीच उरलेली नाही. या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे.दरम्यान, पीडित तरुणी ही भाजपची पदाधिकारी असून, तिच्या आरोपानंतर भाजपने देशमुख यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तो तडकाफडकी मंजूरदेखील केला आहे. तशी माहिती चंद्रकांत पाटील यांनीच सोशल मीडियावर दिली आहे. विशेष म्हणजे, देशमुख यांनी सदर महिला आपल्याला हनीट्रॅपमध्ये फसवत असल्याची तक्रार यापूर्वी ओशिवरा पोलिस ठाण्यात दिलेली आहे.