BuldanaVidharbha

शिवप्रेमींची जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीव्र निदर्शने

बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील गड किल्ले खाजगी व्यक्तीच्या ताब्यात देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गड किल्ले भाड्याने देण्याची बाब नाही. या मागे महाराजांचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या भावना त्यामागे जोडल्या गेल्या आहे. असे निर्णय हितावह नाही. सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे प्रतिपादन प्रा. डी. एस. लहाने यांनी केले. शिवप्रेमी विचार मंच बुलडाणा द्वारा गडकिल्ले खाजगी व्यक्तीस दत्तक देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयापुढे तीव्र निदर्शने करून निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोण चिंचोले, सामाजिक कार्यकर्ते सुनील सपकाळ ,एडवोकेट जयश्रीताई शेळके, डी एस लहाने, पत्रकार गणेश निकम केळवदकर,अमोल रिंढे, सुनील जवंजाळ पाटील, प्राध्यापक शाहीनाताई पठाण,प्रमोद टाले, प्राचार्य संजीवनी शेळके, आशा शिरसाठ, प्रतिभा भुतेकर, प्रा.अमोल वानखेडे, पीएम जाधव, एडवोकेट सतीशचंद्र रोटे, मोहम्मद सोफियान, आशीष गायकी, सुरेश सरकटे ,सुजित देशमुख, जाकीर कुरेशी, एडवोकेट प्रकाश जाधव, कुमारी के.एस. पंडित, ऍडव्होकेट संदीप जाधव, गणेश उबरहांडे, गजानफर खान, पिक गौरव देशमुख, रामदास शिंगणे, मिलिंद वानखेडे आदींची उपस्थिती लाभली.
यावेळी बोलताना लहाने यांनी सरकारच्या खाजगीकरणाचा चांगलाच समाचार घेतला. शिवप्रेमीच्या भावनाशी खेळू नका ते परवडणारे नाही अशा इशारा त्यांनी दिला. ऍड. जयश्री शेळके,प्रा. संजिवनी शेळके,प्रा. शाहिनाताई पठाण यांनी मते मांडली.संचलन सुनील सपकाळ यांनी तर आभार मनसेचे नेते अमोल रिंढे पाटील यांनी मानले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

इतिहासाशी खेळणे थांबवावे- डॉ. तुपकर

छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय पूर्वी घेतला तोच निर्णय पुन्हा आता घेतला आहे. फक्त यामध्ये शब्दखेळ केला आहे. सरकारने इतिहासाशी खेळणे थांबवावे. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे.असे निर्णय कदापी खपवून घेणार नाही. याची किंमत मोजावी लागेल. असे डॉक्टर मनोहर तुपकर यावेळी म्हणाले.


हा तर तुघलकी निर्णय – सुनील सपकाळ

काही निर्णय इतिहासात गाजले आहेत. त्यातला एक तुघलकी निर्णय आहे. वास्तवाचे भान न ठेवता घेतला गेलेला निर्णय म्हणजे तुघलकी निर्णय. सध्या सरकारने असाच एक निर्णय घेतला आहे. गड किल्ले इतरांच्या ताब्यात देण्याचा. हा निर्णय घातक ठरणार आहे. या मुळे किल्ले,जुन्या वस्तू चे पवित्र राहणार नाही. असे मत शिवजयंती उत्सव समितीचे सचिव सुनील सपकाळ यांनी व्यक्त केले. सरकार कशाचेही खाजगीकरण करत आहे त्यातून आता महाराजांचे गड किल्ले देखील सुटले नसल्याचे सांगून सपकाळ यांनी शासनाचे निर्णयावर कठोर टीका केली.मनसेचे अमोल रिंढे ,मराठा सोयरिकचे सुनील जवंजाळ पाटील यांनी आक्रमक घोषणा बाजी केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!