आळंदी (अर्जुन मेदनकर ) : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होणाऱ्या नवरात्र उत्सवात सर्व भारतभर देवीची आराधना विविध पद्धतीने केली जाते. स्त्री शक्तीचा सन्मान करणाऱ्या या उत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागात भोंडला आयोजित केला जातो जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना रुजली जाईल. हिच सांस्कृतिक परंपरा जपत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर व श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये महाभोंडला आयोजित केला. रंगबिरंगी पारंपारिक वेशभूषा करून सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सहभाग नोंदवला.
भोंडल्याची सुरुवात सर्व महिला शिक्षक व महिला पालकांच्या उपस्थितीत ऐरावत पुजन होऊन ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा’ या गीताने गणेश वंदना झाली. विविध पारंपारिक गीते झाल्यानंतर ‘आड बाई अडोणी ‘या गाण्याने सांगता झाली . पर्यवेक्षिका अनिता गावडे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी सचिव अजित वडगांवकर यांनी नवरात्रीचे महत्त्व सांगून सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य दिपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, रामदास वहिले श्रीरंग पवार, राहुल चव्हाण यांनी महाभोंडल्यास शुभेच्छा दिल्या. भोंडल्याची गाणी संध्या भोज, वैशाली शेळके, हेमांगी उपरे, अनुज्यायिनी राजहंस, विद्या वाघुले, शशिकला वाघमारे, राजश्री भुजबळ, वर्षा काळे, मनीषा पवार, यमुना कुऱ्हाडे, मनीषा कुंजीर, निशा कांबळे, प्रतिभा भालेराव, मिनाक्षी पाटील, कल्पना घोलप, स्वागती कदम, सायुज्यता तायडे, लीना नेमाडे, सुनीता रंधवे, सुनीता गिरी यांनी मिळून गायली. खिरापत वाटून भोंडल्याची सांगता झाली. सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले.