खामगाव (तालुका प्रतिनिधी) – जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांच्या विनापरवानगी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्षाविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील टॉवर चौकातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात चार ते पाच कार्यकर्ते हे आंदोलन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता यामध्ये जिल्हाध्यक्षांसह चार ते पाच जण तिथे दिसले. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून महाविकास आघाडीच्या विरोधात नारेबाजी करीत पुतळा दहन केला. या सर्वांनी यासंदर्भात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता विना परवानगी एकत्र आले. तसेच त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचा आदेशाचे उल्लंघन केले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे पोलिस जमादार विनोद सखाराम राठोड (४८) खामगाव शहर पोलिस स्टेशन) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल करीत भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख व इतर चार ते पाच कार्यकर्त्यांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.