नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) :- हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागात पावसाचा जोर वाढला असून सर्वाधिक फटका नवापूर तालुक्यात बसत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाच्या वतीने शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. तर नवापूर शहरातील रंगावली नदी काठावरील १०० घरातील ४०० जणाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक नद्या आणि नाल्यांचा पाणी पातळीत वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहे. नदी काठावरील नागरिकांना दक्ष राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. तलाठी सर्कल आणि ग्रामसेवकांनी मुख्यालय सोडू नये आशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
Read Next
22 hours ago
त्रिशंकु विधानसभेचे संकेत पाहाता, सरकार स्थापनेसाठी ‘महायुती’, ‘महाआघाडी’कडून ‘प्लॅन ए व बी’ही तयार!
2 days ago
मतदारांच्या मनात काय?, उद्या उघड होणार!
3 days ago
राज्यात सत्तास्थापनेचा पेच निर्माण होणार?; बहुतांश एक्झिट पोल संदिग्ध!
4 days ago
विधानसभेसाठी राज्यात उद्या मतदान; साडेचार हजार उमेदवारांचा ठरणार फैसला!
5 days ago
प्रचारतोफा थंडावल्या! आता गुप्त भेटीगाठींवर जोर!
Leave a Reply