मेरा बु , ता. चिखली(ब्रेकिंग महाराष्ट्र) : – गेल्या काही दिवसापासून संततधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे रात्रीला अंधार तर दिवसभर घराबाहेर चिखलाचे साम्राज्य निर्माण निर्माण झाल्याने गावकऱ्यांना फार त्रास सहन करावा लागत आहे . असे असतांना मेरा खुर्द येथील विजवितरण विभागाने तासनतास विजेचा लपंडाव चालविला आहे .
तर मात्र अव्वाच्या सव्वा बिल देण्यात येत असून फॉल्टी मीटरच्या तक्रारी करून सुध्दा महावितरण दुर्लक्ष करीत आहे.
मेरा खुर्द येथे ३३ केव्ही उपकेंद्रा अंतर्गत २२ ते २५ गावे समाविष्ट आहेत . या उपकेंद्राचा कारभार कनिष्ठ अभियंता काकडे यांच्याकडे सोपाविला असून यांच्या मार्गदर्शनाखाली १० लाईनमन काम करतात . संततधार पावसामुळे मेरा बु , गुंजाळा , मनुबाई , अंत्री खेडेकर आदी गावातील विहिर , बोर , हातपंप , आणि तलावात पाणी साठा मोठया प्रमाणावर वाढला आहे तरी सुध्दा विजवितरण विभाग शेती कृषी पंपासाठी फिरते चक्र प्रमाणे सहा तास वीज पुरवठा सोडत आहे . तसेच गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावल्याने ढगाळ वातावरण आणि गावात गल्लोगल्लीत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे . रात्रीच्या वेळात घराबाहेरील घाणपण्याच्या गटारावर मच्छराचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने गावकऱ्यांना रात्रंदिवस घराचे दरवाजे बंद ठेवून फॅन चालू ठेवावे लागतात . अगोदरच गावागावात विविध आजाराने डोके वर काढल्याने गावकरी हतबल होवून गेले आहे मात्र असे असतांना मेरा खुर्द विजवितरण विभागा कडून तासनतास विजेचा लपंडाव केल्या जात आहे . त्यामुळे गावकऱ्यांना घाण पाण्यावरील मच्छर व दुर्गंधी मुळे रात्रभर लहान मुले , वयोवृद्ध , आजारी असलेले रुग्णाचे फार हाल होत आहे . घरामध्ये रात्रंदिवस लाईन सुरू राहावी व खंडीत होवू नये म्हणून गावकरी दरमहा येणारे वीजबिलाचा वेळवर भरणा करतात संध्या शेतातील पिकामध्ये खुरपणी , कोळपणी , वखरने आदी शेत मशागतीची कामे शेतकरी कुंटुंबातील महिला पुरुषाना करावी लागत असल्याने महिला सकाळी लवकर उठून स्वयंपाक करतात त्यातही गॅस सिलेंडरच्या भावात मोठी वाढ झाल्याने गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे त्यामुळे एकीकडे सरकारने मोफत गॅस आणि दुसरीकडे १५ रुपायात दिलेले विद्युत मीटर नावालाच असून मोफतच्या नावाखाली दरमहा हजारो रुपायाची अव्वाच्या सव्वा बिले जनतेकडून वसूल केल्या जात आहे . फॉल्टी मीटर असून सुद्धा ग्राहकांनी दिलेल्या तक्रारीची कोणतीही दखल घेतल्या जात नाही केवळ अव्वाच्या सव्वा बिले देवून वसुली होत आहे. अशा या विजवितरण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे गावकऱ्यांना आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे . हे मात्र खरे ! .