ChikhaliCrime

अंत्री कोळीत गळफास घेऊन आत्महत्या

चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील अंत्री कोळी येथील मदन शिंदे (वय ५०) यांनी टिन शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना आज (दि.११) सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, अधिक तपास रायपूर पोलिस करत आहेत.

सविस्तर असे, की मदन बक शिंदे वय ५० हे मूळचे अंत्री कोळी येथील असून, चिखली येथील आठवडी बाजारात त्यांचे किराणा दुकान होते. त्यांनी आज अंत्री कोळी येथील समाधान मोरे यांच्या टिन शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती प्राप्त होताच या बाबतची खबर मयताचे पुतणे प्रदीप शिंदे यांनी रायपूर पोलिसांना दिली. यावरुन रायपूर पोलिसांनी घटनास्थळी जावून चौकशी व पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. सदर आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून, या घटनेचा पुढील तपास ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका रवींद्र पवार, पोहेका शितोळे हे करीत आहेत. मदन शिंदे यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. अद्याप त्यांचा अंत्यविधी झालेला नव्हता. उद्या (दि.१२) सकाळी ९ ते९:३० दरम्यान अंत्यविधी केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात होती.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!