BULDHANAKhamgaon

गणेश मंडळांसाठी तात्पुरती वीज जोडणीची सोय!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीज दर आकारण्यात येणार आहे. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण अकोला परिमंडलाच्यावतीने करण्यात आले आहे.

महावितरणची योजना; सार्वजनिक गणेश मंडळांना आकारणार घरगुती वीजदर - Marathi  News | MSEDCL scheme; Domestic electricity tariff to be charged to public  Ganesh Mandals | Latest solapur News at Lokmat.comगणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. गणेश मंडळांनी आवश्यक कागदपत्रासह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचे वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे इ. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घेण्यात यावी. गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. आपात्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२, १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३४३५ हे टोल प्रâी क्रमांक ग्राहकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात साजरा होणार्‍्या गणेश उत्सवासाठी तत्काळ आणि अधिकृत वीज जोडणी देण्यासंदर्भात सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे सर्व क्षेत्रिय कार्यालयांना निर्देश दिले आहेत. गणेश मंडळांनीही गणेश उत्सव आणि त्याचे महत्वाला लक्षात घ्यावे आणि सुरक्षेला प्राधान्य देत अधिकृतच वीज जोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!