इंद्रायणी प्रदूषण व सिद्धबेटातील विकास कामांमध्ये प्राधान्याने लक्ष घालणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : मागील आठवड्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आळंदी शहराचा गावभेट दौरा केला होता. त्या पार्श्वभूमीवर आळंदीतील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांच्यासह आळंदी पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच ह. भ. प. महाराज मंडळींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद, शिवसेना जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, नितीन गोरे, अशोकराव भुजबळ, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, संभाजीराव श्रीरसाट, शिवसेना तालुका प्रमुख राजुशेठ जवळेकर, संचालक विजयसिंह शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, विशाल पोतले, ज्योतीताई अरगडे, महादेव लिंबोरे, मारुती सातकर, संदिप येळवंडे, योगेश पगडे, संदिप काचोळे, शंकरराव घेनंद, राहुल थोरवे, निखिल वर्पे, माऊलींचे मानकरी ज्ञानेश्वर कुऱ्हाडे पाटील, सचिन विरकर, रायबा साबळे, शिवाजीराव पगडे तसेच शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते.
या प्रवेश प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकास कामे मार्गी लावली जातील. यात परिसरातील रस्ते, इंद्रायणी नदी प्रदूषण व सिद्धबेटातील विविध विकास कामांमध्ये प्राधान्याने लक्ष घालणार असल्याचे सांगून सर्वांचे शिवसेनेत स्वागत त्यांनी स्वागत केले. यावेळी वारकरी साम्रदयातील मान्यवर महाराज यांचे सह परिसरातील विविध संस्था मध्ये कार्यरत कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्योजक राहुल चव्हाण यांचे हस्ते माऊलींची मूर्ती आणि तुळशीहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर येथे आषाढी यात्रा काळात भाविक, वारकरी यांना राज्य शासनाचे माध्यमातून सेवा सुविधा उपलब्ध केल्या बाबत वारकरी, महाराज मंडळी यांनी कौतुक करीत मुख्यमंत्र्याचे कार्याचे समाधान व्यक्त केले.