LONARVidharbha

पोलिस अधीक्षकांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षेची पुस्तके वाटप, वृक्षारोपण

बिबी (प्रतिनिधी) – जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे लावा झाडे जगवा, शिका आणि शिकवा ही संकल्पना घेऊन बिबी येथील येथील पोलीस स्टेशनच्यावतीने ठाणेदार सोनकांबळे यांनी गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रेय वाघमारे यांनी स्पर्धापरीक्षेबाबत स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

बिबीपासून जवळच असलेल्या मांडवा येथे शेतकर्‍याच्या मुलाने ग्रामीण भागातील मुलांसाठी स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, आर्मी भरती याबाबतची प्रशिक्षण अ‍ॅकॅडमी सुरू केली आहे. या अ‍ॅकॅडमीमध्ये मुलांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुस्तकांची कमतरता असल्याचे ठाणेदार सोनकांबळे यांना दिसून आले असता, त्यांनी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पुस्तके आणि ५१ झाडांचे वृक्षारोपण करून पोलिस अधीक्षकांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन किनगावराजा पोस्टेचे ठाणेदार दत्तात्रेय वाघमारे यांनी केले. यावेळी गावातील पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ, तरुण मंडळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!