आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री. ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात गेले सात दिवस श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ हरिनाम गजरात झाला. मंगळवार ( दि.१५ ) श्रीमद् भागवत कथेची सांगता श्रीमद् भागवत ग्रंथाचे पुजन शांती ब्रम्ह गुरुवर्य मारोती महाराज कुरेकर यांचे हस्ते झाले. यावेळी भारतीय संविधान पुजन, भागवत ग्रंथाची मिरवणुक, मंदिर प्रदक्षिणा हरीनाम जयघोषात झाली.
गुरुवर्य शांतीब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांचे सप्ताहात हरी कीर्तन झाले. यावेळी थोरल्या पादुका मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि उपरणे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने भाविक्त भक्त उपस्थित होते. महाप्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बुधवारी ( दि. १६ ) काल्याचे किर्तन ह.भ.प. गुरुवर्य आदिनाथ महाराज फपाळ यांचे झाले. दरम्यान सप्ताहास देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचा सन्मान ट्रस्ट तर्फे करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू तापकीर, खजीनदार ह.भ.प दत्तात्रेय गायकवाड, ह.भ.प परमेश्वर महाराज फपाळ,मनोहर भोसले, हिरामण बुर्डे, रोहिदास परांडे, शांताराम तापकीर, रमेश महाराज घोंगडे, साहेबराव काशीद, राजेंद्र नाणेकर यांचेसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.