चिखली (महेंद्र हिवाळे) – बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये प्रहार संघटनेचे चिखली तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गायकवाड, तसेच चिखली येथील शिवसेना (ठाकरे) पक्षाचे स्थानिक नेते तथा माजी पंचायत समिती उपसभापती मदनराजे गायकवाड यांच्यासह बहुसंख्य शिवसैनिक, कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या स्थानिक नेत्यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना (शिंदे गट) यांना शहर व तालुक्यात चांगलीच बळकटी आली आहे.
शिंदे गटांत प्रवेश करणार्यांमध्ये दीपक सुरडकर, सुरेश सुरोशे, नाना गायकवाड, भास्कर मुळवंडे, रमेश मुळे, राजेंद्र सवडतकर, विलास गायकवाड, धनंजय खरे, श्रीकांत टेहरे, नितीन गायकवाड, गणेश गायकवाड, अरुण गायकवाड, गणेश गावंडे, सुनील देशमुख, शुभम इंगळे, अभय शिंदे, विशाल आराख, विठ्ठल निकाळजे, गोपाल गायकवाड, संकेत लाटे, संजय जाधव, गजानन गायकवाड, शेषराव बोराडे, आत्माराम गायकवाड, दिनकर गायकवाड, राजेंद्र गायकवाड, संतोष गायकवाड, अरुण गायकवाड, बबन गायकवाड, सुभाष वायाळ, अनंत गायकवाड, किसन गायकवाड, सतीश गायकवाड, नितीन गायकवाड, प्रकाश गायकवाड, जगदेव गायकवाड, शिवाजी वरपे, गजानन वरपे, गणेश बोचरे, यांच्यासह पळसखेड दौलत, चांदई, गोदरी, चिखली, भोकर, खोर, भोगावती, तांबुळवाडी येथील असंख्य कार्यकत्यांचा समावेश होता.
यावेळी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, दत्ता खरात, शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख नीलेश गुजर, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, नितीन राजपूत, शिंदे गटाचे उपतालुका प्रमुख मयूर पडोळ, अनिल सुसर, विजय जायभाये, दीपक तुपकर विजय दुरणे, ज्ञानेश्वर खांडवे, सचिन कोठाळे यांच्यासह बहुसंख्य शिवसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.