बुलढाणा (प्रशांत खंडारे) – समृद्धी महामार्गावर झोपेची डुलकी लागून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. समृद्धी महामार्गावरच नव्हे बुलढाणा जिल्ह्यातील रस्त्यांवरही अपघाताचे सत्र सुरूच आहे.१३ ऑगस्ट रोजी ५.२० दरम्यान दुसरबीड मलकापूर नजिक मुंबई कॉरिडोर चॅनल नंबर ३०६.३ या समृद्धी महामार्गावर चालकाला झोपेची डुलकी लागल्याने कार पलटी होऊन अपघात झाला. झालेल्या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. पार्थ हरपाल वय ३४ वर्ष राहणार राजकोट असे जखमीचे नाव आहे. तर आज साडेसहा ते सात वाजेदरम्यान बुलढाणा लगतच्या केळवद गावातही बस, ट्रक आणि पीकअप वाहनांचा विचित्र अपघात घडल्याने दोघेजण जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.१३ ऑगस्ट रोजी राजकोट येथील पार्थ हरपाल व वाशिम येथील प्रवीण मधुकर खडसे हे जीजे ०३ एलजी ८४१९ क्रमांकाच्या कारने वाशिमकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना चालकाला झोपेची डुलकी लागली. त्यामुळे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात चालक पार्थ-पाल गंभीर जखमी झाले तर प्रवीण खडसे किरकोळ जखमी झाले आहे. दरम्यान, महामार्ग पोलीस पीएसआय पवार, विष्णू गोलांडे,संदीप किरके, डॉक्टर वैभव बोरडे, अॅम्बुलन्स चालक शिंदे, अमोल जाधव श्रावण गटे, भागवत भुसारी जाधव, व गाडी चालक गणेश चाटे,पथक यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान, बुलढाणा लगतच्या केळवद येथे चिखली वरून बुलढाणाकडे येणार्या बसचा ट्रक आणि महिंद्रा पीकअपमध्ये भिडत झाली. या अपघातात दोन जण जखमी झाले. काही वेळ घटनास्थळावर वाहतूक ठप्प झाली होती.