AURANGABADBULDHANAMarathwada

सिद्धार्थ महाविद्यालयास ७५ पुस्तकरुपी ग्रंथ दिले भेट!

– संस्थाध्यक्षसह प्राचार्य व इतरांनी केला सत्कार!

बुलढाणा (संजय निकाळजे) – मानवाच्या भावनांचे,अनुभवांचे कल्पनांची बांधणी पुस्तकातील पानापानात दिसून येते. एकमेकांना कधीच न भेटलेल्या जीवांची भेट, संवाद पुस्तक वाचन केल्याने होते.पुस्तक म्हणजे दोन भिन्न अनुभवांची सांगड घालणारी चमत्कृती आहे. पुस्तकाशी मेळ घालून जगणारी व्यक्ती कधीच एकटी असू शकत नाही.सामाजिक जीवनाचे अंग त्याला आहे. कला,विज्ञान,शास्त्र, धर्म या विविध विषयांनी पुस्तकांची वेल नटलेली असते. ग्रंथासारखा दुसरा कोणी गुरु असूच शकत नाही. ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञान, समज विवेक यांची गुंफण घालून मानवी तथा वैश्विक मूल्यांनी संसार सजवला जातो. ग्रंथाचे महात्म्य अनेक विचारवंतांनी व्यक्त केले आहे. ग्रंथ किंवा पुस्तक हे मानवी जीवनासाठी अनमोल आहेत. त्याशिवाय, हे जग सूर्यप्रकाशहिन होईल. म्हणून कवी प्रीतमकुमार मिसाळसरसुद्धा त्यांच्या चार ओळींमध्ये लिहितात-ग्रंथ हे मार्गदर्शक सदा सर्वकाळ, तयांची कृपा बरसते आभाळ..घेई भरून घागर जनाची, ग्रंथाचा महिमा ज्ञानाची माळ..! आणि अशीच ज्ञानाची माळ पुढे गुंफण्यासाठी माजी विद्यार्थी पत्रकार विजय खरात यांनी जाफराबादच्या सिद्धार्थ महाविद्यालयास ७५ ग्रंथरूपी पुस्तकांची भेट देऊन उत्तरदायित्व निभावले.

जाफराबाद येथील सिद्धार्थ महाविद्यालयात सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष दादासाहेब म्हस्के व सचिव डॉ.राहुल म्हस्के यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ.र.तु.देशमुख यांचा तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पत्रकार विजय खरात यांनी ७५ ग्रंथाचे महाविद्यालयाच्या ग्रंथालयास दान. त्यानिमित्त त्यांचा सहपत्नीक सत्कार दादासाहेब म्हस्के,सचिव डॉ.राहुल म्हस्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे सचिव राहुल म्हस्के यांनी शिक्षण प्रक्रियेत प्राध्यापक,प्राचार्य यांची भूमिका विशद करून शिक्षण क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरे जावेच लागेल त्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे असे आवाहन केले.विजय खरात यांनी ग्रंथरूपी पुस्तके भेट देताना सांगितले की मी, माझी पत्नी, दोन मुली,एक मुलगा आम्ही सर्व न्यू हायस्कूल ते सिध्दार्थ महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी असून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक,सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक प्रगल्भता निर्माण व्हावी या उदात्त हेतूने देशात आप-आपल्या कार्यकाळात वैचारिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक क्रांती घडवून आणलेल्या थोर महापुरुषांच्या जीवन गाथा,विचारधारा प्रगट करणारी ७५ ग्रंथ महाविद्यालयास भेट देऊन उत्तरदायित्व निभावल्याचे म्हटले.
कार्यक्रमांचे सत्कारमूर्ती नवनिर्वाचित प्राचार्य,डॉ.र.तु.देशमुख यांनी महाविद्यालयात रुजू झाल्यापासून ते प्राचार्यपदी निवड होईपर्यंतचा इतिहास मांडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पत्रकार विजय खरात यांनी महाविद्यालयास ७५ ग्रंथाचे महाविद्यालयाच्या ग्रंथालयास दान दिले. या श्रेष्ठ दानबद्दल संस्थापक,अध्यक्ष दादासाहेब म्हस्के,सचिव,प्रा.डॉ. राहुल म्हस्के,प्राचार्य,डॉ.र.तु.देशमुख यांनी पत्रकार विजय खरात यांचा यथोचित सत्कार करून गौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के यांनी अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाच्या सुरवातीपासून ते आजपर्यंतच्या विकासाचा आलेख सर्वांसमोर मांडला. आणि महाविद्यालयाच्या जडणघडणीत समाजघटकातील सर्व स्तरातील समाजबांधवांना अपेक्षित असलेले नाविन्यपूर्ण नवं तत्रंज्ञान्ययुक्त जागतिक स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी लाभदायी ठरेल अशा विविध अंगांनी परिपुर्ण बौध्दीक क्षमता निर्माण व्हावी उद्दातहेतून महाविद्यालयाची घोडदौड सुरू आहे आणि विद्यार्जनाच्या माध्यमातून अशीच सूरू अशी शाश्वती अध्यक्षीय भाषणात दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शाम सर्जे यांनी केले.याप्रसंगी डॉ.पी.वाय.गडकरी,मा.चद्रकांत चौतमोल,प्रविणकुमार काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील माजी सहायक अभियंता डिगंबर बापु जगदाळे व डी.बी.रामदीन, माजी पंचायत समिती सभापती चंद्रकांत चौतमोल, संपादक विजय खरात, प्रशांत डोंगरदिवे, दादाराव गडकरी, हेमचंद्र चिंधोटे,अशोक फुलमाळी याची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे संचलन प्रा.संदिप पाटील यांनी केले. तर आभार प्रा.सौ.सुनंदा सोनुने यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!