BULDHANAVidharbha

बुलढाणा शहराच्या विविध विकासकामांना १० कोटीचा निधी!

– शासनाच्या नगरविकास विभाग अंतर्गत शासन निर्णय जारी

बुलढाणा (संजय निकाळजे) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर मेहरबान झाले. त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बुलढाणा शहरातील विविध विकास कामासाठी १० कोटी एवढा प्रचंड निधी मंजूर केला आहे. शासनाच्या नगरविकास विभाग अंतर्गत शासन निर्णय क्रमांक न. प. वै- २०२३ प्रक्र ३२८ (९०) भाग १ / नवि – १६ नुसार वैशिष्ट पूर्ण योजनेअंतर्गत हा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

यामध्ये शहरातील विकासात भर घालणारे पुढील प्रमाणे कामे करण्यात येणार आहे. यात प्रभाग क्रमांक ७ मधील धर्मवीर आखाडा परिसरात स्पोर्ट थेरपी सेंटर इमारतीचे बांधकाम त्यामध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविणे, मशनरी व परिसरांचा विकास यासाठी तब्बल १ कोटी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. तसेच प्रभाग क्रमांक ७ मधील धर्मवीर आखाडा परिसरात योग केंद्र इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ६० लाख रुपयाचा निधी, प्रभाग क्रमांक १४ मधील वारकरी इमारतीचे उर्वरित काम करण्यासाठी ९० लाख रुपये, प्रभाग क्रमांक १३ मधील श्री स्वामी समर्थ केंद्र सभागृह बांधकाम करण्यासाठी ३० लाख रुपये, नगर परिषद हदीत असलेल्या आयुर्वेदिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ५० लाख रुपये प्रभाग, क्रमांक ६० मधील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सभागृह बांधकामासाठी ५० लाख रुपये, आयएमए सभागृह बांधकाम साठी ५० लाख रुपये, जुने मार्केट इक्बाल नगर परिसरात सभागृह बांधकामासाठी १ कोटी रुपये, एकूण ५ कोटी ५५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मोताळा नगरपंचायत अंतर्गत मोताळा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील सभागृह बांधकाम करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बुलडाणा नगर परिषद अंतर्गत असलेल्या नगरपरिषद हद्दीतील मलकापूर – चिखली तसेच जयस्तंभ चौक ते धाड रोड मार्गावरील दुभाजकांमध्ये आकर्षक रोषणाई करिता तसेच स्मारकाचे विद्युतीकरण करण्यासाठी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बुलडाणा शहरातील धाड रोडवर असलेल्या सरकारी तलाव परिसरात सौदर्यकरण, नौका विहार, सांडपाणी प्रक्रिया राबविणे, रंगीत कारंजे, रोषनाई, पाणीपुरवठा वितरण, पाककृती, प्राणी शिल्प बसविणे यासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिवाजी हायस्कूल परिसरातील पेव्हर ब्लॉक बसविणे यासाठी २५ लाख, तानाजी नगरातील हनुमान मंदिर परिसरातील विविध विकास कामासाठी ४० लाख रुपये अशी ३ कोटी ४५ लाख रुपये एकूण १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
या सर्व विकासकामानंतर शहराचा कायापालट होईल, अशी भावना जनमानसात व्यक्त होत आहे. यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना आ. संजय गायकवाड म्हणाले की, आमदार काय करू शकतो हे आपल्याला जनतेला दाखवून द्यायचे आहे. ते आपण कृती मधून करून दाखवू असे ते म्हणाले.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!