AalandiVidharbha

आळंदी परिसरात शालेय मुलांचे डोळे येण्याची साथ!

– आरोग्य विभाग सतर्क

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात १७ शाळांमध्ये डोळ्याची साथ असलेल्या मुलांची तपासणी करण्यात आली यामध्ये नऊ हजार ६३९ मुलांची तपासणी करण्यात आली यात ८१३ मुले बाधित असल्याचे आढळले. तसेच खेड तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत शालेय मुलांची तपासणी शुक्रवारी ( दि. २१ ) करण्यात आली. यात १४ हजार ८१९ मुलाची तपासणी झाली. यात १५३ मुले बाधित असल्याचे सर्वेक्षणात आढळून आल्याची माहिती खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.

गेल्या पाच दिवसां पासून आळंदी परिसरातील शाळां मधील मुलांचे डोळे येण्याची साथ असून शाळकरी मुलांमध्ये प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळुन आले आहे. यामुळे खेड तालुका आरोग्य अधिकारी, आळंदी ग्रामीण रुग्णालय, जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून आरोग्य पथके रवाना करीत मुलांचे आरोग्याची तपासणी आरोग्य सल्ला सेवा, उपचार आणि मार्गदर्शन तसेच आळंदी परिसरातील शालेय तसेच वारकरी शिक्षण संस्था मध्ये जनजागृती करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली. या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आळंदी येथील सर्व शाळांत १० आरोग्य पथके तैनात करीत आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली आहे. खेड तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाडी येथेही सर्व
सीएचओ कर्मचारी व डाॅक्टर यांचे मार्फत सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. सोमवार पासुन १६५० पेक्षा जास्त रूग्ण डोळे आलेले आढळुन आल्याचे डॉ. पारखे यांनी सांगितले. आळंदी येथील शालेय मुलांचे प्रमाण जास्त असून शालेय मुलांना हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे, ज्यांना डोळे आलेत त्यांना घरी विलगीकरण करणे आणि डोळ्यांत टाकण्या साठी औषधी ड्राॅप या उपाय योजना राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना उपचार व घरी विलगीकरण सांगितले आहे.

साथ आटोक्यात येण्यासाठी आरोग्य विभाग, पंचायत समिती खेड, सीईओ, डीएचओ यांचे मार्गदर्शना खाली उपाय योजना सुरु आहेत. अशी माहिती डॉ. पारखे यांनी दिली. यासाठी पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ रामचंद्र हंकारे, गटविकास अधिकारी विजय शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ उर्मिला शिंदे यांचेसह सर्व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत. सर्व आरोग्य विभाग, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सिस्टर, आरोग्य सहाय्यक कार्यक्षेत्रात सर्व्हे करी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!