AalandiPachhim Maharashtra

आळंदीत ‘हरिपाठ पेनड्राईव्ह’ लोकार्पण सोहळा उत्साहात

– ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
– श्री ज्ञानेश्वर ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ तिसऱ्या पर्वाचे आळंदीत उदघाटन
– ह. भ. प. सुभाष महाराज गेठे यांनी निरूपण केलेल्या हरिपाठाचा पेनड्राईव्हचे लोकार्पण

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : माऊलींच्या साहित्याची महत्ती सर्वत्र आहे. माऊलींच्या व त्यांच्या साहित्याच्या सानिध्यात राहणे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्वज्ञानाची सांगड घालून हे तत्त्वज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हे आपल्या सर्वांची जिम्मेदारी. तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्त्वज्ञानाची सांगड घालत समाज घडवावा असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केले. एक चांगला व आदर्श विद्यार्थी घडविण्याचा उद्दात हेतू उराशी बाळगून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ एक संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचे उदघाटन लेखक वक्ते, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षते खाली हरिनाम गजरात झाले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी श्री ज्ञानेश्वर ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ तिसऱ्या पर्वाचे आळंदीत उदघाटन पत्रकार श्रीकृष्ण पादीर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर द्वितीय वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार वडगाव शेरी विधानसभा बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी स्व. गुलाबराव गोरे प्रतिष्ठान चाकणचे विकास गोरे, आदर्श सरपंच व अध्यक्ष बापदेव शिक्षण संस्था, रासेचे विजय शिंदे, स्वामी विवेकानंद विद्या विकास प्र. सं. खरपुडीचे अध्यक्ष बापूसाहेब चौधरी, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर, आळंदी शहर पत्रकार संघाचे प्रमुख अर्जुन मेदनकर, ओळख श्री ज्ञानेश्वरीची पाठाचे अध्यापक ह. भ. प. सुभाष महाराज गेठे, ह. भ. प. भागवत महाराज साळुंखे, ह. भ. प. उमेश महाराज बागडे, ह. भ. प. श्रीधर घुंडरे, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सचिव विश्वंभर पाटील, सदस्य सोपान काळे, धनाजी काळे, प्राजक्ता हरपळे, विलास वाघमारे, तुकाराम गवारी, नरहरी चौधरी, निर्मलाताई चव्हाण, संगीता पाटील, सोपान दाभाडे, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, राज्यातील विविध संस्था व शाळा यांचे अध्यक्ष, सचिव, प्रतिनिधी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थी व पालक, नवीन वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या दोन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकाचे माजी नगरसेवक योगेश मुळीक यांच्या वतीने सायकल , तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना कै. ज्ञानेश्वर हरपळे यांच्या स्मरणार्थ मुलगी प्राजक्ता हरपळे यांच्या वतीने एक वर्षाचा पूर्ण शैक्षणिक खर्च (वह्या, पुस्तके, दोन शालेय गणवेश, शालेय फी सह), पाचव्या व सहाव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रकाश काळे यांच्या वतीने शालेय गणवेश, सात ते अठरा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना सोपान काळे यांच्या वतीने शालेय बॅग तसेच सात ते दहा क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना श्रीधर घुंडरे यांच्या वतीने सार्थ ज्ञानेश्वरी व ११ ते १८ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना हेमांगी कारस्कर यांच्या वतीने टिफिन डब्बा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान, पुणेचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्या हस्ते ह. भ. प. सुभाष महाराज गेठे यांनी निरूपण केलेल्या हरिपाठाच्या पेनड्राईव्हचा लोकार्पण सोहळा हरिनाम गजरात झाला. प्रास्ताविकात चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी योग्य वयात योग्य संस्कार व शिक्षण देणे काळाची गरज असून श्रद्धेने केलेले कोणतेही कार्य कधीही विफल जात नाही असे सांगितले. तसेच ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत होणारे सकारात्मक अमुलाग्र बदल पाहून मनस्वी झालेला आनंद व्यक्त केला. या उपक्रमास चरित्र समितीच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरवर्षी राज्यात ज्या शाळा हा उपक्रम चालवतील त्यातील उत्कृष्ट उपक्रम चालवणाऱ्या दहा शाळांना प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस त्यांनी जाहीर केले.

विद्यार्थी मनोगतातून विवेक गुट्टे याने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमामुळे स्वतःमध्ये व अध्ययन प्रक्रियेमध्ये झालेले सकारात्मक बदल व्यक्त केले. अजित वडगावकर यांनी इतर शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने पाच लाखाची मदत जाहीर केली. माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वडगावकर कुटुंबीय व संचालक शिक्षण संस्था यशस्वी रित्या चालवित असल्याचे कौतुक केले. उपक्रम चालवणाऱ्या संस्था व चरित्र समितीचे कौतुक करत गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याच्या उद्देशाने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाचे शिक्षण देण्याचे कार्य हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. श्रीकृष्ण पादीर यांनी ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते या उक्तीनुसार ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या उपक्रमाद्वारे ज्ञानेश्वरी ग्रंथाचे ज्ञान, विचार विविध घटकांच्या व माध्यमातून समाजात पसरविण्याचे कार्य करावे असे सांगितले. अध्यापकांच्या वतीने सुभाष महाराज गेठे यांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी निस्वार्थ भावनेने सेवा व सहकार्य देणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती व पालक आदींचे अभिनंदन व कौतुक केले. ग्रंथातील ज्ञान हे फक्त ऐकण्यासाठी नसून त्यातील विचार कृतीत आणले तरच जीवन सार्थक होईल असे सांगितले. महेश सूर्यवंशी यांनी या उपक्रमासाठी लागेल ते योगदान व सहकार्य करण्याच्या आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ या संस्कारक्षम उपक्रमाचे व हा उपक्रम यशस्वीरित्या चालविण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला अशा श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान व आळंदी शहर पत्रकार संघ यांचे कौतुक केले. माऊलींच्या साहित्याची महत्ती सांगत माऊलींच्या व त्यांच्या साहित्याच्या सानिध्यात राहणे आपल्या सर्वांचे भाग्य असून या सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जोडीला तत्वज्ञानाची सांगड घालून हे तत्त्वज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणे हे आपल्या सर्वांची जिम्मेदारी असल्याचे सांगितले. तसेच कर्तुत्वाचे उत्तुंग हिमालय नवीन पिढीला दाखविण्याची जबाबदारी ही वरिष्ठांची असल्याचे सांगत साहित्यातील सकारात्मक ऊर्जेची शक्ती विद्यार्थ्यांना द्यावी असे विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले. आभार प्राचार्य दीपक मुंगसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!