BULDHANAChikhaliVidharbha

मुस्लीम, दलितांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा!

बुलढाणा/चिखली (महेंद्र हिवाळे) – राज्यात मुस्लीम, दलित, आदिवासी व अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. त्यांचा निषेध करत सरकारने तातडीने या समूहाच्या हक्कांचे संरक्षण करावे, शासन दरबारी आमच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज आक्रोश मोर्चातून देण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रामध्ये मुस्लीम, एस.सी, एस.टी, अल्पसंख्याकं समूहावर जे अन्याय वाढत आहे, त्या संदर्भात शासनाच्या विरोधात घोषणा देऊन शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच आमच्या मागण्या ह्या रास्त असून शासन दरबारी या मागण्यांची दखल घेतली नाही तर वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यांमध्ये तीव्र आंदोलन करेन, असा इशारा याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव यांनी दिला. निवेदनामध्ये दिलेल्या प्रमुख मागण्या – जरीन खानचा पोलिस कोठडीत खून करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा ३०२ चा गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करावे. जरीन खानच्या कुटुंबियांना ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी. नांदेड जिल्ह्यातील बोंधार गाव येथील अक्षय भालेरावच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा व्हावी. रेणापूर येथील मातंग बांधवाचा खून करणार्‍या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. भूम येथील फय्याज पठाण आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून शिक्षा व्हावी. इंस्टाग्रामच्या रिलचा आधार घेत मुस्लीम तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अमानुष मारहाण केल्याप्रकरणी संबंधित पोलिसांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी. गोरक्षणाच्या नावाखाली पोलिसांना हाताशी धरून वाढत असलेल्या उन्मादाच्या घटना थांबवावेत. सुरेश चौव्हाण, टी राजासिंग, कालीचरण बाबाने जाहीर सभामधून प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी संबधितांवर आणि आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करावी. संभाजी खरात दुसरबीड, ता.सिंदखेडराजा याला आत्महत्तेस प्रवृत्त करण्यावर कडक शासन करावे. शरद वेडे रा. भोसा ता. सिंदखेडराजा यांच्या मारेकर्‍यांना कठोर शिक्षा करण्यात यावी. गायरान जमिनीचे पट्टे त्वरीत नियमाकुल करावे. या सर्व मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा महासचिव प्रशात वाघोदे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या मोर्च्यामध्ये जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, विष्णू उबाळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अलकाताई जायभाये, जिल्हा उपाध्यक्ष भीमराव शिरसाठ, विधी सल्लागार अमर इंगळे, शहराध्यक्ष मिलींद वानखेडे, समाधान डोंगरे, मनोज खरात, रमेश आंबेकर, शेषराव मोरे, शेषराव बोदडे, विद्याधर गवई, अर्जुन बोर्डे, संजय धुरंधर, बाळू भिसे, बबन वानखेडे, दिलीप राठोड, संघपाल पन्हाळ, महेन्द्र पन्हाळ, आबाराव वाघ, उमेश वानखेडे, मधुकर शिंदे, आकाश साळवे, उध्दव वाकोडे, युवा आघाडी महासचिव विशाल गवई, दिलीप राजभोज, विजय राऊत, फिरोज खान, सलीम पटेल, रियाज खान, शाकीरभाई पठाण लोणार शहर उपाध्यक्ष, शेख अमीर भाई, यासीन भाई लोणार, शाहरुख खान, महेंद्र हिवाळे, जितू निकाळजे, विशाल मोरे, उमेश सोनोने यांच्या सहीत शेकडो वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!