ChikhaliVidharbha

वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून गोरगरिबांच्या मुलांना वाटले शालेय साहित्य!

मेरा बुद्रूक (कैलास आंधळे) – वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा मेरा बुद्रुक फाटा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. येथील येथील मोलमजुरी करणार्‍या तरुण किशोर दत्तात्रय वायाळ या तरूणाने समाजासमोर हा आदर्श प्रस्तुत करून वाढदिवसाचा थाटमाट करणार्‍यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.

सध्या सर्वत्र धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांचेच वाढदिवस मोठा खर्च करून साजरे करण्यात येत आहेत. यासाठी मोठा खर्च करण्यात येत आहे. अतिरेकी सजावट, फुगे फोडणे, मेणबत्त्या जाळणे, फटाके वाजवणे असा खर्च सध्या वाढदिवसाला करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. मात्र सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची प्रथा सध्या बंद झाली आहे. क्वचितच असा उपक्रम पाहायला मिळत आहे. मेरा बुद्रुक येथील येथील मोलमजुरी करणार्‍या तरुण किशोर दत्तात्रय वायाळ याने वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता मेरा बुद्रुक फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वितरित केले.

मेरा बुद्रुक येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविणारा तरुण किशोर दत्तात्रय वायाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बाकीच्या खर्चाला फाटा देत आपला वाढदिवस शाळेमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये साजरा केला. शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मधुकर पडघान हे होते. मेरा बुद्रुक फाटा येथील जिल्हा परिषद वस्ती शाळेमध्ये गरीब, अनाथ मुले शिक्षण घेतात. काही विद्यार्थ्यांचे पालक मजुरी करून स्वतःच्या मुलांना जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवतात. अशा शाळेमध्ये अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य घेऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी किशोर वायाळ मजुरी करणार्‍या तरुणांनी आपल्या वाढदिवसावर अनाठही खर्च न करता अशा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून अनेक तरुणांसमोर समोर आदर्श प्रेरणा ठेवली आहे. आजकालची तरुण पिढी मोठमोठे बॅनर लावून धाब्यावर पार्ट्या, फटाके अशा प्रकारचे खर्च करताना दिसतात परंतु जर किशोर वायाळने साजरा केलेला वाढदिवस हा गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी नक्कीच काही प्रमाणात का होईना मदत ठरेल.
समाजातील दानशूर,मोठ मोठ्या मनाच्या लोकांनी जर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक हात मदतीचा दिला तर गरीबाची मुले ही शैक्षणिक प्रवाह मध्ये येतील. यावेळी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप विद्यार्थ्यांना केले असता, त्यांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसून आला.

यावेळी मुख्याध्यापक मधुकर पडघान यांनी आजच्या युवापिढीने अशाच प्रकारचे वाढदिवस साजरे करून समाजापुढे आदर्श ठेवावा असे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ब्रेकिंग महाराष्ट्रचे सहाय्यक संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार कैलास आंधळे यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर, पत्रकार सुनिल अंभोरे यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व अशा प्रकारचे साहित्य वाटप करून गरीब विद्यार्थ्यांना जर मदत केली तर त्यांचे शैक्षणिक भवितव्य आणखीन उज्वल होऊ शकते, असे मनोगत व्यक्त केले. किशोर वायाळ यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून प्रेरणा, आदर्श समाजासमोर ठेवला तेच आदर्श, प्रेरणा इतरांनी घेऊन अशाच प्रकारचा वाढदिवस शाळेत, अनाथ आश्रमात, अनाथालयात, रुग्णालयात जर वाढदिवस साजरा केला तर खर्‍या अर्थाने वाढदिवस साजरा होईल. यावेळी ज्या तरुणाचा वाढदिवस होता तो किशोर दत्तात्रय वायाळ, मुख्याध्यापक मधुकर पडघान, शिक्षक अशोक कुमठे, पत्रकार सुनील अंभोरे, पत्रकार कैलास आंधळे, सुनील गायकवाड, अंगणवाडी सेविका कुमठे मॅडम, शाळा समिती अध्यक्ष अशोक पैठणेसह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!