CrimeVidharbha

शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू, देऊळगावराजा पोलिसांची चौकशीला दिरंगाई!

चिखली ग्रामीण (प्रतिनिधी) – देऊळगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निमगाव वायाळ येथील खासगी शिकवणीवर्ग चालविणार्‍या एका शिक्षकाचा संशयास्पद मृतदेह ८ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आढळून आला होता. या प्रकरणात घातपात झाल्याची तक्रार देवूनही पोलिसांकडून तपासात दिरंगाई केली जात आहे, अशी तक्रार मृतकाच्या वडिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षकाकडे  ८ जुलै रोजी केली आहे.

या तक्रारीत नमूद आहे, की देऊळगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या निमगाव वायाळ येथील रहिवासी असलेले प्रल्हाद श्रीराम वायाळ, वय ६५ वर्षे यांचा मुलगा रामदास प्रल्हाद वायाळ वय ३७ वर्षे याचे शिक्षण एमए (इंग्रजी) बीएड पर्यंत झालेले असल्याने तो ३ ते ४ वर्षापासून नोकरीसह खाजगी शिकवणीसाठी देऊळगांव मही येथे होता. परंतु दिनांक ८ जून २०२३ रोजी देऊळगांवमही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. त्याचे मृत शरीर बघितल्यानंतर कोणत्याही सामान्य व्यक्तीलादेखील हे कळून येत होते की, माझ्या मुलाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्याचा घातपात घडवून आणण्यात आला आहे. त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही अथवा आरोपीला पकडण्यात आलेले नाही. यामागे पोलिसांची दिरंगाई होत असल्याचां आरोप मृतकाच्या वडिलांनी केला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!