Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

सोलापूर जिल्हा प्रशासनांकडून निवडणुकांची तयारी सुरू!

– मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुका पाहता मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार नोंदणी, नाव दुरुस्तीसह मतदार यादीतील त्रुटी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मंगळवारी दिले. यानिमित्ताने आगामी निवडणुकांची जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मतदार यादीतील सुसूत्रपणा यावा यासाठी मतदारातील मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, नवीन नाव नोंदणी करणे, दुरुस्ती करणे, घरोघरी भेट देऊन नावाची पडताळणी करणे, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार यादीतील गुणवत्ता वाढविणे, तफावती शोधणे व त्या दूर करण्यासाठी योजना व वेळापत्रक तयार करणे, मतदार यादी प्रसिद्ध करून त्यावर दावे हरकती घेणे, आलेल्या दाव्यावर निर्णय घेणे आदी कामे जिल्ह्यातील बीएलओ यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे.
या पुन्हा पुनरिक्षण उपक्रमाची सुरुवात एक जून २०२३ ते २० जुलै २०२३ कालावधीमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर २१ जुलै ते २१ ऑगस्ट पर्यंत अधिकारी घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. २२ ऑगस्ट ते २९ सप्टेंबर पर्यंत मतदार यादी मध्ये ञुटी दूर करणे, ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर पर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करणे, त्यानंतर १७ ऑक्टोंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, ३० नोव्हेंबर पर्यंत दावे हरकती स्वीकारणे, २६ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती निकालात काढणे, अंतिम मतदार यादी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन एक जानेवारी २०२४ रोजी छफाईसाठी देणे, मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करणे असा हा कार्यक्रम असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!