Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

‘सोलापूर झेडपी’च्या माध्यमिक शिक्षण विभागाला मिळाले वर्षातच चार शिक्षणाधिकारी!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी जावेद शेख यांची लातूर येथे बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी तृप्ती अंधारे यांची शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एकाच वर्षात भास्करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख आणि आता तृप्ती अंधारे असे चार शिक्षणाधिकार्‍यांनी कामकाज पाहिले आहे.

माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार गेल्या काही दिवसापासून रिक्त होते. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार तत्कालीन शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु त्यांच्याकडील हा पदभार तात्काळ काढून जावेद शेख यांच्याकडे देण्यात आला. शेख यांची बदली झाल्यानंतर आता पुन्हा नवीन शिक्षणाधिकारी म्हणून अंधारे यांचे नियुक्ती करण्यात आले आहे. त्यामुळे एका वर्षात जवळपास तीन शिक्षणाधिकार्‍यांनी पदभार सोडला आणि आता चौथ्या शिक्षणाधिकारी म्हणून अंधारे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकार्‍यांची खुर्ची सध्या अस्थिर तर नाही ना असे दिसत आहे. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षण विभाग हा खूपच कीचकट असून शासनाची नियमावली आणि संस्थापक चालकांची मर्जी सांभाळून काम करणे मोठ्या जीकरीचे काम आहे. अंधारे यांच्याकडे माध्यमिक शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आला असल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारी काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!