– जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्ण जिल्हा पिंजून काढणार!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी निवडणुका पाहता व पक्षसंघटन मंजबूत करण्याच्या दृष्टीने जिल्हा काँग्रेस सरसावली असून, १० जुलैपासून काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह पदाधिकारी तीन दिवस जिल्हा दौरा करणार आहेत. यामध्ये बूथ कमिट्या, ,मंड़ल समित्या तसेच ग्राम काँग्रेस कमिट्या सक्षम होण्याबाबत बैठकीत चर्चा व उपाययोजना करण्यात येणार आहेत.
यामध्ये सोमवार, १० जुलै रोजी सकाळी १० वाजता देऊळगावराजा, दु.१२ वा.सिंदखेडराजा, दु. ३ वा. लोणार व सायं.५ वा. मेहकर. मंगळवार ११ जुलै रोजी सकाळी १० वा. शेगाव, दु.२ वा. संग्रामपूर, दुपारी ४ वाजता जळगाव जामोद. बुधवार, १२ जुलैरोजी सकाळी ११ वा. बुलढाणा, दुपारी १ वा. मोताळा, दु. ३ वाजता मलकापूर व सायंकाळी ५ वाजता नांदुरा येथे बैठका होणार आहेत. तरी सदर दौर्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सरचिटणीस सतिष मेहेंद्रे यांनी केले आहे. असे जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख श्लोकांनद ड़ांगे यांनी कळविले आहे.