BULDHANAVidharbha

भरमसाठ पगार तरी खुडणावर ड़ोळा!

– कामाच्या बिलापोटी कमिशनचे ३५ हजार घेताना रंगेहाथ पकड़ले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भरपूर पगार असतानाही पैशाची लालूच केली की त्याचे परिणाम हे भोगावे लागणारच. कामाच्या बिलाचा चेक देण्यासाठी ३५ हजाराची लाच घेताना खामगाव तालुक्यातील जयरामगड़ येथील ग्रामसेवक अच्युतराव काकड़े (वय ३८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकड़ले. ही घटना ८ जुलैरोजी बुलढाणा- चिखली रोड़वरील हाजी मलंग दर्ग्याजवळ घड़ली.

भरमसाठ पगार तरी काही कर्मचार्‍यांना खुड़ण घेतल्याशिवाय खिसा भरला असे वाटत नाही. त्यामुळेच की काय लाचखोरी वाढतच आहे. खामगाव तालुक्यातील जयरामगड़ येथे तक्रारदाराकड़ून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाचा विकास योजनेतून काम करण्यात आले. या कामासाठी पुरवलेल्या साहित्याचे काढलेल्या बिलापोटीचा मोबदला तसेच उर्वरित बिलाचा चेक देण्यासाठी ग्रामसेवक अच्युतराव माणिकराव काकड़े, रा.गौतमनगर धामणदरी येळगाव ता.जि.बुलढाणा याने सहा लाखाच्या बिलाच्या सहा टक्के प्रमाणे ३६ हजार लाचेची मागणी करून ३५ हजारावर तड़जोड़ीत झाली. याबाबतची तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून सदर ग्रामसेवकाला उपरोक्त ठिकाणी लाच घेताना रंगेहाथ पकड़ले.
ही कारवाई मारूती जगताप पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र अमरावती, देवीदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शीतल घोगरे पोलीस उपअधीक्षक, सचिन इंगळे पोलीस निरीक्षक, पो.ना. विनोद लोखंड़े, जगदीश पवार, मोहम्मद रिजवान, रवींद्र दळवी, मपोका स्वाती वाणी, पोकॉ शैलेश सोनवणे, पोकॉ अशरद शेख लाप्रवि बुलढाणा यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!