Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

सोलापुरातील भाजपनेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबतची युती पचनी पडेना!

सोलापूर (संदीप येरवडे) – भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची धुरा अजित पवार यांच्याकडे दिली आहे. परंतु भाजप पक्षासह देवेंद्र फडणवीस यांची ही रणनीती सध्या सोलापूर येथील भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना रूचत नसल्याचे दिसत आहे.

राज्यातील भाजप पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत केलेली युतीचे काम चांगले असताना भाजप पक्षांनी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत हातमिळवणी करून त्यांना सत्तेमध्ये कसे काय समाविष्ट करून घेतले. याचा काही अंदाज सध्या भाजपच्या नेत्यांना लागत नसल्याचे दिसत आहे. विशेषतः भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला समाविष्ट करून घेतल्यामुळे आता भाजपच्या नेत्यासह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसची प्रशासनामधील काम करण्याची पद्धत ही भाजपच्या कित्येक पटीने पुढे आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्ते आता मागे पडतील की काय अशी भीती त्यांना वाटत आहे. नुकतेच सोलापूर शहरातील चार माजी नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकला. त्यामुळे पक्षामध्ये वाढती गर्दी पाहता निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होण्याची भीती सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.


माढा, करमाळा तालुक्यातील आमदारांचे वाढले वजन!

माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे व करमाळा तालुक्याचे आमदार संजय शिंदे या दोन आमदाराचे वजन या युतीनंतर मात्र जोरदार वाढले आहे. या दोघांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सख्य असून, दुसरीकडे दोन देशमुख आणि अक्कलकोट तालुक्याचे दादा यांनी मात्र या युतीबाबत मौन बाळगले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!