नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) – सूर्यकन्या तापी नदीला आज जन्मोत्सव निमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात पूजन केले व साडीचोळीचा आहेर अर्पण केला. यावेळी संगमेश्वर या ठिकाणी तापी नदी पात्रात भाविकांनी गर्दी केली होती.
तापी नदीला खानदेशची जीवनदायिनी असे म्हणतात. खानदेश समृद्ध करण्यासाठी तापी नदी चा मोठा वाटा आहे. तापी नदीने या भागात केवळ शेतीच जगविली नाही तर येथील समाज जीवन सुद्धा जगविले आहे, याचे ऋण फेडण्यासाठी महिला भाविकांनी तापी जन्म उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. पहाटेपासून भाविकांनी संगमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी स्नान आणि पूजे साठी आले होते. महिला भाविकांनी तापी नदीत स्नान करत. त्यानंतर तापी नदीचे पूजन केले. साडी- चोळी सह सोळा शृंगार अर्पण केला.