नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक
नंदुरबार (ब्रेकिंग महाराष्ट्र) – जिल्ह्यात जानेवारी ते जून महिन्यात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या 10 मातांचा प्रसूती वेळी मृत्यू झाला असुन, तर 86 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्या आहे.
एकूणच नंदुरबार जिल्हा कुपोषण आणि माता मृत्यूच्या नावाने ओळखला जात असला तरी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या वतीने कागदी घोडे नाचविण्याचे प्रकार ही समोर येत आहेत. एकूणच शासनाच्या विविध योजना असतानाही माता मृत्यू होतात कसे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील माता मृत्यू आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण चिंतेची बाब असून प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करणे ही आवश्यक आहे. एकूणच ही आकडेवारी जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार घेताना दगावलेल्या माता आणि नवजात बालकांचे आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही घरी प्रसूती करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने त्याची कुठलीही नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे माता आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असू शकण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.