आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सोळू ग्रामपंचायतच्या वतीने यावर्षी ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ‘ सोळू गावातील दोन आदर्श कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात प्रधान करण्यात आला.
यावर्षी पुरस्काराचे मानकरी ललिता तापकीर, वैशाली ठाकूर यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूपात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे होते. शासनाचे धोरण प्रमाणे पुरस्कार वितरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी करण्यात आले. या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच कल्याणी ठाकूर, उपसरपंच पूजा गोडसे, युवराज ठाकूर, अल्पेश कांबळे, पूजा चौधरी, सावित्राबाई ठाकूर, ग्रा. सदस्य विनोद ठाकूर, गणेश गोडसे, सदस्य शशिकला ठाकूर, मनीषा गोडसे, ग्रामसेवक श्रीम. योगिता माटे, कामगार तलाठी महेंद्रसिंग ठाकूर , भाऊसाहेब ठाकूर, विलास राज, दत्तात्रय चौधरी, नंदकुमार ठाकूर यांचेसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, वैद्यकीय अधिकारी श्रीमती कल्याणी साद, प्रफुल ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोळू आरोग्य उपकेंद्रात नव्याने नियुक्ती झालेल्या भाग्यश्री ठाकूर, सीमा ठाकूर यांची आशा वर्कर म्हणून नेमणुकीचे पत्र देण्यात आले.