BULDHANAKhamgaonVidharbha

सोयाबीन बियाणे विक्रीत शेतकर्‍यांची लूट!

– खामगावातील अंकुर कृषी केंद्राचा परवाना निलंबीत करा, उपविभागीय कृषी अधिकार्‍यांची शिफारस!

खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – खामगावातील सरकी लाईन भागातील अंकुर कृषी केंद्र येथून चढ्याभावाने सोयाबीन बियाणे विक्री होत असल्याची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक होत, सदर प्रकार हाणून पाड़ला. ही घटना ३१ मेरोजी घड़ली. सदर कृषी केंद्राचा परवाना निलंबित करण्याची शिफारस उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारे यांनी वरिष्ठांकड़े केली आहे. सोयाबीन बियाणे विक्रीत जिल्हाभरात शेतकर्‍यांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईने चव्हाट्यावर आला आहे.

कोणीही यावे अन् टिचली मारून जावे, अशीच काहीशी गत शेतकर्‍याची झाली आहे. खरीप हंगाम सुरू होत नाही तोच शेतकर्‍यांची लूट करण्यासाठी जणू पैज लागते की काय असेच चित्र दिसत आहे. खामगाव येथील सरकी लाईनमधील अंकुर कृषी सेवा केंद्र येथून तालुक्यातील नागापूर येथील शेतकरी पिंटू लोखंड़कार यांनी केड़ीराम चंदा कंपनीचे दोन बॅग सोयाबीन बियाणे ३६०० रूपये प्रतिबॅगप्रमाणे खरेदी केले. याबाबतचे ७२०० रुपयांचे बीलदेखील सदर दुकानदाराने शेतकरी लोखंड़कार यांना दिले. शेतकरी लोखंड़कार यांचे म्हणण्यानुसार संबंधित दुकानदाराने त्याच्याकड़ून प्रती बॅग ४२०० रुपयांप्रमाणे दोन बॅगचे ८४०० रुपये घेतले म्हणजे प्रतिबॅग ६०० रुपये जादा घेतले. हा प्रकार कानावर पड़ताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्याम अवथळे व इतर कार्यकर्ते हे या कृषी केंद्रावर पोहोचत दुकानदाराला चांगलेच धारेवर धरले व तालुका कृषी अधिकारी श्रीमती भाग्यश्री देसले यांच्या कानावर ही बाब घातली.

श्रीमती देसले या तातडीने संबंधित कृषी केंद्रावर आल्या व कृषी केंद्र व गोदामाची झाड़ाझड़ती घेतली. उपविभागीय कृषी अधिकारी व्यवहारेसुध्दा तातडीने पोहोचले व पंचनामा केला. शेतकरी पिंटू लोखंड़कार यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित दुकानदाराने प्रतिबॅग ६०० रुपये जादा घेतल्याने बियाणे नियंत्रण कायदा १९६६ आणि अत्यावश्यक वस्तू कायदा (इसीए) १९५५चा भंग केल्याने अंकुर कृषी केंद्र बियाणेविक्रीचा परवाना निलंबित करण्याची शिफारस परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बुलढाणा यांच्याकड़े केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरीदेखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!