LONARVidharbha

बिबी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – येथील बिबी ग्रामपंचायत, राजर्षी शाहू बँक, महिला अर्बन, महाराष्ट्र अर्बन, बसस्थानक चौक अशा विविध ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी बिबी ग्रामपंचायतीच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन महिला सरपंच चंदाबाई गुलमोहर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सौ.संचिता सतीश चंडालिया व श्रीमती लताबाई घाईत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार बिबी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांच्याहस्ते देण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिव, सदस्य, गावातील प्रतिष्ठित महिला, ग्रामस्थ, तरुण मंडळी, विद्यार्थी, संविधान बचत गट महिला, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!