आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कोयाळी भानोबाची ( ता. खेड ) येथे झाडावर वीज कोसळून झाडाने पेट घेतला. दिघे भाडळे वस्ती या ठिकाणी झाडा वरती वीज कोसळली. या झाडाला यावेळी आग लागली. नागरिक, शेतकरी यांनी पावसाचं वातावरण असल्याने सुरक्षित राहण्यासाठी योग्य ठिकाणी सुरक्षित निवारा शोधावा, झाडाचे खाली उभे राहू नये. पावसाचे काळात पुढे जाण्याचे नियोजन करून झाडाखाली कोणीही थांबू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सायंकाळी पाच पासून आळंदी पंचक्रोशीत मोठ्या वादळी वाऱ्यासह विजा चमकल्या. यावेळी पावसाने जोर धरत परिसरात पाणीच पाणी केले. लहान गार पडून पाऊस झाला. यावेळी कामगार, महिलांसह वाहन चालकांची मोठी तारांबळ झाली. वाहनचालक रस्त्याचे दूतर्फ़ा वळचणीला उभे राहून पाऊस कमी होत असल्याची वाट पाहताना ठिकठिकाणी दिसले. मिळे त्या ठिकाणी वाहन चालकांनी निवारा गाठला. अनेक मुख्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने रहदारीत वाहनांचे ये जा करण्यामुळे अनेकांच्या अंगावर पाणी उडाले. रस्त्याचे दुतर्फा फुटपाथ पावसाळी नाली क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्याने चेंबर वरून पाणी रस्त्यावर आले. मरकळ रस्ता, वडगाव चौक, हजेरी मारुती मंदिर आदी ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. पावसाचे प्रमाण वाढल्याने काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता. सुमारे दोन तास पावसाने आळंदी परिसरात हजेरी लावली. परिसरातील बालकांनी पावसात बुजून गार गोळा करण्याचा आनंद घेतला.