BULDHANAVidharbha

बुलढाण्यात आज भा.बौ.महासभेच्यावतीने धम्म परिषद

बुलढाणा (संजय निकाळजे) – दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा व जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने बुलढाणा येथे भव्य धम्म परिषदेचे आयोजन शनिवार, १३ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या धम्म परिषदेला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जागतिक बुद्धिस्ट फेडरेशनचे सचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परणू राजरत्न आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गोल्डन पॅलेस लॉन्स खामगाव रोड माळविहीर भाग बुलढाणा येथे होणार्‍या या कार्यक्रमप्रसंगी सकाळी साडेआठ वाजता धम्म ध्वजारोहण, सकाळी नऊ ते बारा धम्मदेशना, दुपारी एक वाजता प्रमुख मार्गदर्शन व दुपारी तीन वाजता भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी धम्मदेशना भंते विनय कीर्ती महादेव अकोला, भंते संघपाल वडगाव वडोदा मलकापूर, भंते सुमेध नक्षी बुद्ध लेणी खगोसा लातूर हे उपस्थित राहणार असून, यावेळी यश सिद्धी सैनिक संघ यांच्या वतीने राजरत्न अशोकराव आंबेडकर यांना मानवंदना व संरक्षण देण्यात येणार आहे. तर रमाईच्या समूह चिखली व बुलढाणाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

यावेळी संस्कार प्रमुख रविकांत जाधव, विभागीय संघटक सुखदेव गावंडे, महासचिव सुखदेव इंगोले, वाशिम जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र छापाने, राज्य महासचिव राजेश मोरे, विभागीय अध्यक्ष आर. पी. अवचार, विभागीय कार्याध्यक्ष अनंता मिसाळ, यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेश इंगोले, अकोला जिल्हाध्यक्ष अरुण चक्रनारायण, राज्य महिला प्रमुख अरुणाताई इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या धम्म परिषदेला जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा चिखली तालुका अध्यक्ष प्रीतमकुमार मिसाळ, समन्वयक दशरथ आराख, उपाध्यक्ष प्रकाश साळवे यांचेसह इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!