Aalandi

श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरास १ लाख ११ हजार रुपयांची देणगी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे जिर्णोद्धाराचे लक्षवेधी काम सुरु आहे. या कामासाठी तापकीर कुटुंबियांकडून लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन १ लाख ११ हजार रुपयांची देणगी माजी आमदार विलाशशेठ लांडे पाटील यांचे हस्ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांचे कडे धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आली.

चऱ्होली बुद्रुक येथील दाभाडे वस्तीतील दानशूर व्यक्तीमत्व श्रीमती लक्ष्मीबाई नारायणराव तापकीर, लक्ष्मण उर्फ बाळासाहेब तापकीर यांचे वतीने मुलीचे लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिराचे जिर्णोद्दाराचे कामास देणगी देण्यात आली. ट्रस्ट चे अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांनी देणगीचा धनादेश माजी आमदार विलासशेठ लांडे यांचे हस्ते स्वीकारला. तापकीर कुटुंबियांचे धार्मिक व सामाजिक योगदानाचे परिसरातील नागरिक, विविध सेवाभावी संस्थाचे वतीने कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!