CrimeLONAR

पहिलीशी घटस्फोट न घेताच बायकोच्या भावजयीशीच गुपचूप उरकले दुसरे लग्न!

मलकापूर पांग्रा (डॉ. गंगाराम उबाळे) – पहिल्या बायकोसोबत कुठल्याही प्रकारचा घटस्फोट झालेला नसतानाही नवर्‍याने पत्नीला अंधारात ठेवून पत्नीच्या भावजईसोबतच गुपचूपपणे लग्न उरकले. ही घटना जेव्हा पत्नीला माहित झाली, त्यावेळेस पत्नीने साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार दाखल केली व पत्नीच्या तक्रारीवरून आरोपी पती व त्याच्या आई-वडिलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील तीस वर्षीय पीडित विवाहित महिला आपल्या मुलासह आपल्या वडिलांसमवेत मलकापूर पांग्रा येथे राहते. अगोदर पीडित महिला हीचे लग्न १९ एप्रिल २०१८ ला चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथील सलमान खाँ युसुफ खाँ पठण यांच्या समवेत झाले होते. लग्न झाल्यानंतर काही दिवस चांगले गेले, मात्र त्यानंतर पीडित महिलेचा पती सलमान खा पठाण, सासरे युसुफखा तुराबखा पठाण, सासू अभिनावी युसूफखाँ पठाण, दीर आरीफ खाँ पठाण, सासूची आई राशदबी आबाजखाँ पठाण, मामसासरा युसूफ खाँ आवाज खाँ पठाण, माम सासू सायराबी युसूफ खाँ पठाण असे घरामध्ये राहत होतो. घराच्या शेजारीच नणंद परवीन बी उर्फ परिपीता युसूफ खॉ, त्यांचे सर्व कुटुंब शेजारीच राहत होते. दोन महिने सुखाचे गेल्यानंतर पीडित महिलेला तिचा नवरा सलमानखा युसूफखॉ पठाण त्रास देऊ लागला, मारहाण करू लागला. माहेरवरून दोन लाख रुपये घेऊन ये असा तगादा रोज पीडित महिलेचा पती तिच्याकडे करू लागला. पीडित महिलेचे सासू, सासरे, दीर, नणंद हेसुद्धा पीडित विवाहितेला त्रास देऊ लागले. पीडित महिलेच्या मलकापूर पांगरा येथील कुटुंबीयांना जीव मारण्याच्या धमक्या देऊ लागले. मुलींना पैसे द्या नाहीतर मुलींचा जीव घेऊ, अशा प्रकारचे धमक्या पीडित महिलेला सासरकडील मंडळी देऊ लागली. ही सर्व आपबिती पीडित महिलेने मलकापूर पांग्रा येथील आई-वडिलांना व भावांना सांगितली. तेव्हा माहेरील मंडळींनी पीडित महिलेची समजूत काढून पुन्हा महिलेला १३ नोव्हेंबर २०२० रोजी सासरी पाठवले.

तेव्हा सासरकडील मंडळींनी पीडित महिलेला चारचाकी गाडी घेण्यासाठी पैसे आणले आहेत का? असे विचारणा केली. तेव्हा पीडित महिलेने नकार दिल्यावर पीडित महिलेच्या नवर्‍याने, सासू-सासर्‍यांनी यांनी पीडित महिलेला लाथा बुक्यांनी त्यांनी मारहाण केली. ही सर्व घटना मी वडिलांना सांगितल्या वेळेस वडिलांनी दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मला माहेरी मलकापूर पांग्रा येथे आणले. मी माझ्या वडिलांजवळ राहू लागली. तरीही पीडित महिलेचा पती हा फोन वरून धमक्या देऊ लागला. तो बाहेरून पैसे आणले नाही तर मी तुला बघून घेईन, अशा धमक्या फोनवरून मेसेज करून देऊ लागला. तसेच पीडित महिलेला तिचा पती सलमानखा युसुफखाँ पठाण याने पत्नीसोबत घटस्फोट घेतलेला नसताना पीडित महिलेच्या भावजयीसोबतच दुसरा विवाह केला. सदर पीडित महिला ही माहेरी मलकापूर पांग्रा येथे असताना तिचा पती सलमानखा पठाण याने पीडित महिलेच्याविरुद्ध शारीरिक संबंध स्थापन केले. तेव्हाही सलमान खा पठाण यांनी पीडित महिलेला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला होता. त्यावेळेस पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून साखरखेडा पोलीस स्टेशनमध्ये सलमान खा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता.

सध्या सलमान खा पठाण जामिनावर सुटला असून, सध्या मला व माझ्या कुटुंबाला धमक्या देत असल्याची पीडित महिलेने साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये सलमान खा पठाण व त्याच्या कुटुंबियाविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या ४९८ (अ), २२३, ४९४, ५०४, ५०६, ५०७, ३४ कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.


या नराधमाने गर्भवती बायकोवर तिची इच्छा नसतांना जबरदस्ती बलात्कार केला. त्यानंतर बायकोशी घटस्फोट झालेला नसतांना बायकोच्या भावाच्या बायकोशी लग्न केले, त्याचे फोटो बायकोला पाठवले. विशेष म्हणजे, जिच्यासोबत दुसरे लग्न केले तिचाही आधीच्या नवऱ्याशी घटस्फोट झालेला नाही. पीडित विवाहितेने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तशी तक्रार दिली. तक्रार पाहून पोलिसही चक्रावले.  ही विवाहिता गरोदर असताना व माहेरी असताना नवऱ्याने तिला धमकीचे मॅसेज पाठवले. पैसे दिले नाही तर दुसरे लग्न करील असे त्या मेसेजमध्ये होते. काही दिवसांत त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो विवाहितेला पाठवले. फोटो पाहून विवाहितेला धक्का बसला. कारण तिच्या भावाच्या बायकोसोबत तिच्या नवऱ्याने दुसरा संसरा थाटला होता. तक्रारदार विवाहितेसोबत त्याने घटस्फोट घेतला नव्हताच. शिवाय जिच्यासोबत दुसरे लग्न केले तिनेही आधीच्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेतलेला नाही. नवऱ्याने केलेले लग्न बेकायदेशीर असल्याचे तक्रारदार विवाहितेचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!