ChikhaliCrime

साखरखेर्डा येथील खुनाचा अठ्ठेचाळीस तासांत छडा

साखरखेर्डा (प्रतिनिधी) – साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दगडाने ठेचून झालेल्या खून प्रकरणाचा चाणाक्ष व कर्तव्यदक्ष एसडीपीओ विलास यामावार व दुय्यम ठाणेदार गजानन मुंडे यांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत छडा लावला असून, आरोपी शोएब शेख उर्फ शेरा शेख रहीम (वय २६) या अटक केली आहे. आरोपीने इतका निघृण खून का केला, याचा तपास पोलिस करत आहेत.

पिंपळगाव सोनारा येथील गणेश लक्ष्मण शिंगणे (वय ४५) यांचा साखरखेर्डा येथील पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात दगडाने ठेचून निर्घृण खून झाला होता. आरोपीने फरशीने मृतकाचे डोके अक्षरशः ठेचून काढले होते. २१ एप्रिलरोजी झालेल्या या खुनाने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी साखरखेर्डाचे दुय्यम ठाणेदार गजानन मुंडे यांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. तर उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार हे साखरखेर्डा येथे ठाण मांडून बसले होते. त्यांनी या तिघांचीही आपल्या स्टाईलने चौकशी केली असता, शेख शाऐब उर्फ शेरा याने खुनाची कबुली दिली. त्यानंतर त्याला रितसर अटक करण्यात आली. आरोपीला जेरबंद करणारे गजानन मुंडे यांनी यापूर्वी प्रदीर्घकाळ गोपनीय शाखेत काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव तपासकामी यशस्वी ठरला आहे. ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडे यांना तपासकामी पोहेकॉ. निवृत्ती पोफळे, रामदास वैराळ, भागवत धुड, पोलिस नाईक अनिल वाघ यांनी सहकार्य केले होते. खून झाल्यानंतर लगेचच तीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे इतर दोन संशयितांना सोडून देण्यात आले आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!