BULDHANACrime

ड्युटीवर निघाली पण घरी परतलीच नाही!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – नियमित ड्युटीवर जाणारी तरुणी बेपत्ता होते.. आणि आधी प्रचंड काळजीत पडलेल्या घरच्या मंडळीला घरी मेसेज मिळतो कि ती तरुणी रेल्वेतून पडून मृत्यू पावली तेव्हा कुटुंबीयांना यावर विश्वास बसत नाही. परंतु ते सत्य असल्यामुळे कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळतो. ही दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथे घडली. पूर्णिमा दिनकर इंगळे असे या मृतक तरुणीचे नाव आहे.

बुलढाणा तालुक्यातील सुंदरखेड येथील 26 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मावशी मीना रामकृष्ण जाधव यांनी काल 30 मार्च रोजी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. बेपत्ता तरुणी पूर्णिमा दिनकर इंगळे बुलढाणा येथील सखी वन स्टॉप या कार्यालयात पॅरामेडिकल विभागात कार्यरत होती. ड्युटीवर जात आहे असे सांगून काल गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ती घरातून निघाली मात्र कामाच्या ठिकाणी पोहोचली नाही.ती मिळून न आल्याने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती.

भुसावळ जीआरपीकडून बुलढाणा शहर पोलिसांना माहिती देण्यात आली की एका तरुणीचा मृतदेह भुसावळ – जळगावच्या दरम्यान पाळधी रेल्वे स्टेशन जवळ मिळून आला असून सदर तरुणीचे नाव पूर्णिमा इंगळे आहे. मृतका जवळ मलकापूर ते जळगाव प्रवासाचे तिकीट आढळून आले व ती गीतांजली एक्सप्रेसने प्रवास करीत असताना ती खाली पडल्याची माहिती भुसावळ जीआरपीचे पीआय गिरडे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!