Head linesKARAJATPachhim Maharashtra

दुधाचे दोनवेळा संकलन करा; ‘सोनाई’चे चेअरमन माने यांचे आवाहन

कर्जत (प्रतिनिधी)- दूध व्यवसायाद्वारे आपण देशाची सेवा करतो आहोत हेच आपण समजून घेत नाहीत, म्हणून सर्वांनीच अत्यंत प्रामाणिक पणे काम करायला पाहिजे, असे आवाहन सोनई दूधचे चेअरमन दशरथ माने यांनी कर्जत येथे दूध उत्पादकांच्या मेळाव्यात केले. तसेच, दुधाचे दोनवेळा संकलन करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

दूध भेसळ प्रकरण सद्या गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथे दूध उत्पादक शेतकर्‍याचा मेळावा सद्गगुरू मिल्क आणी मिल्क प्रोडक्टचे संस्थापक शंकर नेवसे, जगदंबा दूध राशीनचे नारायण जगताप व इतरांच्या सहयोगाने यांच्यावतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनई दूधचे चेअरमन दशरथ माने हे होते. या कार्यक्रमात सुनील शेलार, अंबालिका दूधचे दाने, बाळासाहेब साळुंके, या दूध संकलक व्यावसाईकांनी मनोगते व्यक्त करताना अनेक अडचणी मांडल्या. जगदंबा दुधचे नारायण जगताप यांनी बोलताना दूध संकलन दोन वेळा केलेच पाहिजे, एकाच ठिकाणी संकलन केले पाहिजे असा सल्ला व दर वाढवून मिळावेत अशी मागणी केली. सद्गगुरू उद्योग समूहाचे शंकर नेवसे यांनी बोलताना टक्का दोन टक्का लोकांमुळे सगळे बदनाम होतात, दूध धंदा अत्यंत जोखमीचा आहे, झंझट नको म्हणून लोक दोन टाईम संकलन करत नाहीत, आपण आपल्याच माणसाला मोठे करा, एकमेकाला सहकार्य करा, आपल्या तालुक्याचे नाव खराब करायचे नाही, स्वत: आत्मचिंतन करा, असे आवाहन केले. यावेळी अरविंद वाघ, महेंद्र गुंड, डॉ. मिलिंद नलवडे, आदी मंचावर उपस्थित होते.

सोनई दूधचे चेअरमन दशरथ माने यांनी बोलताना, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, दूध व्यवसायात तरुण पिढी आलेली आहे. दुधाला चांगले दिवस आलेले आहेत. क्वालिटी व काँटीटी वर दूध दर अवलंबून आहेत. दोन वेळेला तुम्ही संकलन करत नाहीत ही चूक आहे. भेसळ म्हणजे काय हे समजून सांगताना दूध संकलन करणार्‍या लोकमधील स्पर्धा कमी झाली व इतरांचे दूध आपण घेतलेच नाही तर अनेक प्रश्न मार्गी लागतील, असे म्हणत सर्वाशी हसत खेळत चर्चा केली. कर्जत तालुक्यात जास्तीचे दूध आहे. मात्र तुम्ही कसे ही काम करत आहात, कारण तुम्हाला घेणे दाणे नाही, पण आपण प्रामाणिक काम केले तर नक्कीच सर्वाचे कल्याण होईल असे सांगताना आपले दूध जगात जाते व दूध भेसळच्या शिक्क्या मुळे आपण बदनाम होऊ शकतो ऐकामुळे अनेकाना हे भोगावे लागेल म्हणून सर्वांनी सचोटीने व्यवसाय करण्याचा सल्ला दिला.

ऊर्जा दूधचे चेअरमन प्रकाश कुतवळ यांनी बोलताना बोलताना महाभारतातील उदाहरण देताना जसा भीष्माला सर्व माहीत असताना तो चुकीच्या माणसाबरोबर राहिल्यामुळे शक्तिशाली असूनही पराभव झाला. तसे आपले होऊ नये आपल्या मुला बाळांना भेसळयुक्त दूध पाजू नका. सीमेवर रक्षण करणार्‍या सैनिकांना भेसळ युक्त दूध पाजनार का, असे म्हणत सर्वांना भावनिक आवाहन करून आपल्याला वरती काहीही घेऊन जायचे नाही आपले पाप येथेच फेडावे लागते याचा विचार करा, असे आवाहन केले. कार्यक्रमाला रावसाहेब खराडे, भानुदास हाके, नारायण तनपुरे, डॉ धस आदी सह अनेक दूध संकलन करणारे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गोरे यांनी केले.

मीडियाला संयम पाळण्याचा सल्ला
एखादा दूध भेसळ करणारा असला म्हणजे सगळेच भेसळ करतात असे नाही. त्यामुळे मीडियाने थोडे संयमाने या विषयाकडे पहावे, मीडियातील बातम्यांमुळे प्रामाणिकपणे दूध उत्पादन करणारे व व्यवसाय करणार्‍याकडे ही संशयाने पाहिले जात असून, हे अत्यंत घातक आहे.
– दशरथ माने चेअरमन, सोनई दूध


एकमेकांचे दूध घेणार नाही घेतली शपथ!
तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दूध घेणार्‍यांना उभे करून सोनाईचे माने यांनी एकमेकांचे दूध घ्यायचे नाही अशी शपथ घ्यायला लावली. आम्हाला महाराष्ट्रातील नऊ तालुके सरळ करायचे आहेत. यामध्ये नगर जिल्ह्यातील सात व बीड जिल्ह्यातील दोन तालुक्याचा समावेश असून महाराष्ट्रात सर्वत्र दोन वेळा दूध संकलन केले जाऊ शकते तर येथे का होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित करत सवय लागेपर्यंत त्रास होईल पण हे आवश्यक असल्याचे म्हटले.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!